ईडन पार्कवर भारताला हमखास यश!
भारत न्यूझीलंड यांच्यातील चौथा टी20 सामना ऑकलँडच्या ईडन पार्कवर होणार आहे. 30 ऑक्टोबर 2026 रोजी हा सामना होईल. भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्यात ईडन पार्कवरील रेकॉर्ड पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे भारताला या मैदानात रोखणं न्यूझीलंडला कठीण जाणार आहे. या मैदानात पहिला टी20 सामना 2019 मध्ये खेळला होता. त्यानेतर 2020 मध्ये टी20 मालिकेतील दोन सामने या ठिकाणि गेले. या दोन्ही भारताने विजय मिळवला. या मैदानात भारताने 204 धावांचं लक्ष्य गाठलं होतं.
[caption id="attachment_1070127" align="aligncenter" width="800"] झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत वैष्णवी शर्माने प्रभावी कामगिरी केली. वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे ...
न्यूझीलंडची स्थिती नाजूक
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून त्यांना त्यांच्याच घरात पराभवाची धूळ चारली आहे. इतकंच काय तर तिसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडने संघात बदलही केला होता. मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही. आता चौथा टी20 ऑकलँडमध्ये होणार असल्याने घाम फुटला आहे. या मैदानात न्यूझीलंड संघाने वेगवेगळ्या देशांसोबत एकूण 33 टी20 सामने खेळले आहेत. त्यात फक्त 13 सामन्यात विजय मिळाला आहे. तर 19 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तीन सामन्यांचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला होता.