
मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून आसनगाव - कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या प्रकल्पांतर्गत कसारा यार्डमध्ये ओव्हरहेड उपकरणांच्या जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या तांत्रिक कामासाठी कसारा येथे पोस्ट एनआय ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांच्या प्रवासात काहीसा बदल होणार आहे.
ब्लॉकचा तपशील व कालावधी
- ब्लॉकची तारीख: दिनांक 30/31.10.2026 (शुक्रवार/शनिवारची रात्र) आणि 31.10/01.11.2026 (शनिवार-रविवारची रात्र)
- वेळ: पहाटे 03:00 ते 05:30 वाजेपर्यंत (2 तास 30 मिनिटे)
- विभाग: उंबरमाळी आणि कसारा दरम्यानच्या 'अप' आणि 'डाऊन' मेन लाईनवर हा ब्लॉक राहील.
मुंबई: मध्य रेल्वेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक मोठी मजल मारली आहे. दिनांक 24 आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी पुणे विभागातील 133.89 किमी ...
मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम
तिसऱ्या मार्गिकेवरून चालवण्यात येणाऱ्या 'अप' दिशेकडील महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे.
- दिनांक 31.10.2026 आणि 01.11.2026 रोजी उशिराने धावणाऱ्या गाड्या: गाडी क्रमांक 01144 दानापुर – एलटीटी विशेष, गाडी क्रमांक 11002 नंदीग्राम एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12545 कर्मभूमी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12112 अमरावती एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12106 विदर्भ एक्सप्रेस, गाडी क्रमांक 17058 देवगिरी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12618 मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12138 पंजाब मेल, गाडी क्रमांक 12290 दुरांतो एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 12154 राणी कमलापती एक्सप्रेस.
- केवळ दिनांक 01.11.2026 रोजी उशिराने धावणाऱ्या गाड्या: गाडी क्रमांक 05585 सहरसा – एलटीटी एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 12152 शालीमार – एलटीटी एक्सप्रेस.
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : शहरातील वारूळाचा मारुती परिसरातील कल्याण रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या महानगरपालिकेच्या ग्रीन वेस्ट डम्पिंग यार्डला ...
उपनगरीय लोकल सेवेवर काय परिणाम?
कसारा येथून मध्यरात्री 03:51 आणि पहाटे 04:59 वाजता सुटणाऱ्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अनुक्रमे 06:30 आणि 07:38 वाजता पोहोचणाऱ्या लोकल फेऱ्या कसारा ते कल्याण दरम्यान तिसऱ्या मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, या गाड्या उंबरमाळी आणि खर्डी स्थानकांवर थांबणार नाहीत.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी या बदलांची नोंद घ्यावी आणि त्यानुसारच आपल्या प्रवासाचे योग्य नियोजन करावे, जेणेकरून कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही.






