Thursday, October 29, 2026

पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई सेंट्रल-इंदौर स्पेशल ट्रेन आता आठवड्यातून 3 दिवस धावणार

मुंबई सेंट्रल–इंदौर स्पेशल ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये पश्चिम रेल्वेने वाढ केली आहे. 5 नोव्हेंबर 2026 पासून ट्रेन क्रमांक 09079 आणि 09080 आठवड्यातून तीन दिवस धावणार आहेत. नवीन वेळापत्रक, प्रवासाचे दिवस आणि तिकीट आरक्षणाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

मुंबई: प्रवाशांची वाढती गर्दी आणि सुविधा लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल-इंदौर स्पेशल ट्रेनच्या (09079/09080) फेऱ्या वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता ही ट्रेन द्वि-साप्ताहिक ऐवजी त्रि-साप्ताहिक (आठवड्यातून 3 दिवस) धावणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी ही माहिती दिली आहे.

नवीन वेळापत्रक आणि दिवस

आगामी 5 नोव्हेंबर 2026 पासून या विशेष गाड्यांच्या वाढीव फेऱ्यांचे वेळापत्रक लागू होईल:
  • ट्रेन क्रमांक 09079 (मुंबई सेंट्रल–इंदौर स्पेशल): ही ट्रेन 5 नोव्हेंबर 2026 पासून मुंबई सेंट्रलवरून दर मंगळवारी, गुरुवारी आणि रविवारी सुटेल.
  • ट्रेन क्रमांक 09080 (इंदौर–मुंबई सेंट्रल स्पेशल): ही ट्रेन 5 नोव्हेंबर 2026 पासून इंदौरवरून दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी धावेल.

बुकिंग कधीपासून सुरू होणार?

ट्रेन क्रमांक 09079 आणि 09080 च्या वाढीव फेऱ्यांचे आरक्षण 30 ऑक्टोबर 2026 पासून सर्व PRS काउंटर्स आणि IRCTC च्या वेबसाइटवर सुरू होईल. प्रवाशांनी गाड्यांच्या वेळा, थांब्यांची ठिकाणे आणि कोच रचनेची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >