Virar Crime: विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी परिसरातील भीषण दुर्घटना; एकाच फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी परिसरातील 'गार्डन अॅव्हेन्यू' इमारतीमधील एका बंद फ्लॅटमधून तिन्ही भावंडांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बाहेर आल्याने संपूर्ण परिसरात मोठी दहशत पसरली आहे. कुमार मनसुखलाल मेहता (५०), दिपेश मनसुखलाल मेहता (५२) आणि खेवणा मनसुखलाल मेहता (४८) असे मृत्यू झालेल्या सख्ख्या दोन भावांचे व बहिणीचे नाव आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या तिघांनीही विष प्राशन करून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ग्लोबल सिटीमधील के-३-डी विंगच्या रूम नंबर १२०३ मधून अचानक दुर्गंधी सुटल्याने शेजाऱ्यांनी सोसायटीच्या मॅनेजमेंटला याची कल्पना दिली. त्यानंतर बोळींज पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि दरवाजा उघडून पाहणी केली असता तिघांचे मृतदेह आढळून आले. हे कुटुंब तीव्र आर्थिक अडचणीत सापडले होते आणि त्यातील एक भाऊ कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा देत होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय आहे, मात्र फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच खरे कारण समोर येईल.



पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून फॉरेन्सिक टीमच्या मदतीने सर्व पुरावे गोळा केले आहेत व मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. दरम्यान, याच इमारतीत मागील एका वर्षात अशा प्रकारची ही तिसरी दुर्दैवी घटना घडल्याने रहिवाशांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी एका माजी सैनिकाने आणि एका दहावीच्या विद्यार्थ्यानेही याच इमारतीत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. बोळींज पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment

प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणाचे राजकारण करणे दुर्दैवी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका

ठाणे : प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून राजकारण करणे दुर्दैवी असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अहिल्यानगर जिल्ह्यातील 4.12 लाख नागरिकांना टँकरद्वारे पाणी; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने

दोनदा मृत्यूच्या दाढेतून परतला कॅप्टन स्मित! डोक्याच्या फ्रॅक्चरनंतर डॉक्टरांनी सांगितलेले सत्य ऐकून बसेल धक्का

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाईदुबाई विमान FZ1073 मधील एक धक्कादायक प्रकार 30 सप्टेंबरला समोर आला होता.  या विमानात

Nashik : कन्यादान योजनेत सामूहिक विवाहासाठी अनुदान, पात्र संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

नाशिक : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील वधू-वरांना विवाहासाठी आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी समाज कल्याण

दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा: शिवसेनेकडून 24 ट्रक्सद्वारे धाराशिवला दिवाळीचा शिधा रवाना

राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारसोबतच शिवसेनाही पूर्ण ताकदीने

'मला 2027 चा वर्ल्डकप खेळायचा आहे...', शुभमन गिलचं नाव घेत रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहित शर्माने टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली असून आता फक्त वनडे खेळत आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत