1/6
Nashik News: प्राचीन काळापासून दर 12 वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक म्हणून कुंभमेळ्याची ओळख आहे. हा केवळ धार्मिक उत्सव नसून भारतीय संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचे प्रतीक मानला जातो. यंदा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा औपचारिक शुभारंभ शनिवार, 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहणाने होणार असल्याचे सांगितले जात आहे. या निमित्ताने ध्वजारोहणाचे महत्त्व, त्यामागील धार्मिक परंपरा आणि ध्वजाची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
2/6
ध्वजारोहणाचा मुहूर्त आणि महत्त्व: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 31 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12:02 ही वेळ महत्त्वाची असल्याचे सांगितले जाते. हा अभिजित मुहूर्त असून, या काळात गुरु ग्रहाचा सिंह राशीत प्रवेश होत असल्याने सिंहस्थ पर्वाला प्रारंभ होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे याच मुहूर्तावर विधिवत ध्वजारोहण केले जाते, अशी माहिती नाशिकमधील शु. य. मा. ब्राह्मण संस्थेचे अध्यक्ष आणि पुरोहित संघाचे प्रमुख विश्वस्त सतीश शुक्ल यांनी दिली.
3/6
शौर्य आणि त्यागाचे प्रतीक : कुंभमेळ्यातील धर्मध्वजाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. ध्वजावर असलेला सिंह पराक्रम आणि शौर्याचे प्रतीक मानला जातो, तर भगवा रंग त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे. ध्वजावर सूर्य आणि चंद्राची चिन्हेही असतात. 'यावच्चंद्रदिवाकरौ' या संकल्पनेतून सूर्य आणि चंद्र अस्तित्वात असेपर्यंत सिंहस्थ कुंभमेळ्याची परंपरा अखंड सुरू राहावी, असा संदेश दिला जातो, असे शुक्ल यांनी स्पष्ट केले. धार्मिक मान्यतेनुसार, ध्वज वाऱ्यावर फडकत असताना त्यातून सकारात्मक ऊर्जेचा प्रसार होतो आणि नकारात्मक शक्ती दूर होतात, अशी श्रद्धा आहे.
4/6
आखाड्यांच्या उपस्थितीची अधिकृत घोषणा : कुंभमेळ्यात ध्वजारोहण ही आखाड्यांसाठी महत्त्वाची धार्मिक परंपरा आहे. आखाड्यांचे आराध्य दैवत, संप्रदायाची परंपरा आणि कुंभमेळ्यातील सहभाग यांचे प्रतीक म्हणून धर्मध्वजाकडे पाहिले जाते. कुंभमेळ्यात 13 प्रमुख आखाडे सहभागी होतात. प्रत्येक आखाडा आपली छावणी उभारतो आणि ध्वजारोहणाद्वारे धार्मिक विधींच्या प्रारंभाची घोषणा करतो.
5/6
ध्वजाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये आखाड्यांचे धर्मध्वज सामान्य ध्वजांपेक्षा वेगळे असतात. ते साधारणपणे 51 ते 55 फूट किंवा त्याहून अधिक उंच लाकडी अथवा धातूच्या खांबावर उभारले जातात. आखाड्यांच्या परंपरेनुसार ध्वजांचे रंग आणि त्यावरील चिन्हे वेगवेगळी असतात. भगवा, लाल आणि पिवळ्या रंगांसह त्रिशूळ, गदा, चक्र आणि डमरू यांसारखी चिन्हे ध्वजावर पाहायला मिळतात. ध्वजारोहणाच्या वेळी महामंडलेश्वर, श्रीमहंत आणि साधू-संत वैदिक मंत्रोच्चार आणि आराध्य दैवताच्या जयघोषात धार्मिक विधी पार पाडतात.
6/6
कुंभातील ध्वज अमृतकलशाचे प्रतीक समुद्रमंथनाच्या पौराणिक कथेनुसार, अमृतकलशाच्या रक्षणासाठी देव आणि ऋषी-मुनींनी विशिष्ट चिन्हांचा वापर केला होता. त्यामुळे कुंभमेळ्यातील धर्मध्वजाला अमृत, अमरत्व आणि आध्यात्मिक साधनेचे प्रतीक मानले जाते. अशा प्रकारे ध्वजारोहण ही केवळ धार्मिक विधीची सुरुवात नसून कुंभमेळ्याच्या परंपरेचे आणि आखाड्यांच्या सहभागाचे प्रतीक मानले जाते.