
मुंबई: मुंबईच्या किनारपट्टीवर तब्बल 20 ठिकाणी फ्लोटिंग होर्डिंग्ज उभारण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या सर्व अफवा असून यात कोणतीही तथ्य नसून हा प्रकार पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या प्रस्तावात प्रत्यक्षात केवळ 4 होर्डिंग्जचा उल्लेख आहे, त्यापैकी 2 आधीपासूनच अस्तित्वात असून केवळ 2 नवीन होर्डिंग्ज उभारण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
Mumbai News: मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरातील लिंकिंग रोडवरील व्हीएन स्फिअर मॉलमध्ये शुक्रवारी (30 ऑक्टोबर) सकाळी आग लागल्याची घटना घडली. मॉलच्या तिसऱ्या ...
जुहू बीच, कार्टर रोड, मार्वे जेट्टी आणि वांद्रे-वरळी सी लिंक परिसरात जाहिरातींसाठी फ्लोटिंग होर्डिंग्ज आणले जात असल्याच्या वृत्तामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर स्पष्टीकरण देताना मंत्र्यांनी सांगितले की, मुंबईचे सागरी पर्यावरण आणि किनारपट्टीचे सौंदर्य जपण्यास सरकारचे प्राधान्य आहे. पर्यावरणाला बाधा पोहोचेल अशा कोणत्याही उपक्रमाला अजिबात पाठिंबा दिला जाणार नाही.
There appears to be considerable misunderstanding and misinterpretation surrounding the hoarding tender floated by the Maharashtra Maritime Board (MMB).
Let me clarify the facts. Of the four floating hoardings proposed, two are existing structures near the Sea Link, and only two are new proposed installations. The information being circulated that 20 hoardings are going to come up in the sea is completely false and misleading. As the Minister for Ports and Chairman of MMB, I would like to put these facts on record. I am also a proud Mumbaikar, and would never support any initiative that compromises Mumbai’s marine environment or obstructs its beautiful waterfront views. We are happy to engage with anyone seeking clarification and share all relevant information transparently. Let us not unnecessarily politicise this issue. The Devendraji Fadnavis-led government is committed to both environmental responsibility and progressive development. The two must go hand in hand. I hope this puts the facts in perspective. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra — Nitesh Rane (@NiteshNRane) October 30, 2026
या संपूर्ण प्रकरणावर विनाकारण राजकारण न करण्याचे आवाहन करतानाच, विकास आणि पर्यावरण यांच्यात योग्य समतोल राखणे हीच सरकारची मुख्य भूमिका असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. सरकार या विषयावर पूर्णपणे पारदर्शक कारभार करण्यास तयार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.





