Saturday, October 31, 2026

Nashik Kumbhmela : फुलांची सजावट, मान्यवरांची उपस्थिती ; गोदाघाटावर भक्तिमय वातावरण

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचा आज औपचारिक प्रारंभ होणार आहे. आज शनिवारी 31 डिसेंबर रोजी नाशिकमधील रामकुंड येथे ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठी नाशिक सज्ज झाले आहे. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.   सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त रामकुंड परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी रामकुंडावर उत्साहाचे वातावरण असून, आमदार राहुल ढिकले आणि आमदार सीमा हिरे उपस्थित झाले आहेत. रामकुंड येथे होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यामुळे नाशिकमध्ये कुंभपर्वाची लगबग पाहायला मिळत आहे. आज सिंहस्थ कुंभमेळ्याचा 12 वाजून 2 मिनिटांच्या मुहूर्तावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये ध्वजारोहण सोहळा होणार आहे. त्यासाठी नाशिकमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह अर्दे राज्य मंत्रिमंडळ, व्हीआयपी आणि विविध आखाड्याच्या साधु-संतांची मांदियाळी होणार आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >