
नवी दिल्ली : देशातील पोलीस दल, सुरक्षा यंत्रणा आणि तपास यंत्रणांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित 'केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदका'साठी वर्ष २०२६ मध्ये विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनांमधील एकूण 490 अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 19 अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असून राज्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या पदकाद्वारे पोलीस व सुरक्षा यंत्रणांमधील उल्लेखनीय योगदानाचा गौरव केला जातो. उत्कृष्ट कार्याची दखल घेणे, उच्च व्यावसायिक कार्यमानके प्रोत्साहित करणे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविणे हा या पदकाचा प्रमुख उद्देश आहे. दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी या पदकांची घोषणा केली जाते.
गोंदिया: भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकता ...
महाराष्ट्रातील पदक प्राप्त अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची यादी:
-
विशेष कृती दल:
-
लक्ष्मी गौतम - सह पोलीस आयुक्त
-
विशाल हिरालाल ठाकूर - पोलीस उपायुक्त
-
आत्माजी शिवाजी सावंत - पोलीस निरीक्षक
-
अमोल माधव माळी - सहाय्यक पोलीस निरीक्षक
-
रामदास तात्याबा कदम - सहाय्यक पोलीस निरीक्षक
-
स्वप्नील रामदास काळे - पोलीस उपनिरीक्षक
-
शिवप्रसाद बाळासाहेब पठारे - पोलीस अंमलदार
-
-
तपास विभाग:
-
कुमार चिंथा - सहाय्यक पोलीस अधीक्षक
-
ऋषिकेश रेड्डी - पोलीस अधीक्षक
-
रामेश्वर रेंगे - सहाय्यक पोलीस आयुक्त
-
माणिक बेदरे - पोलीस निरीक्षक
-
डॉ. एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी - अपर पोलीस अधीक्षक
-
प्रभावती एकुर्के - पोलीस निरीक्षक
-
रितेश आहेर - पोलीस निरीक्षक
-
ईश्वर काटकर - अपर पोलीस अधीक्षक
-
रामचंद्र मोहिते - पोलीस निरीक्षक
-
अश्विनी अभिजीत पाटील - पोलीस निरीक्षक
-
पूजा गायकवाड - उप पोलीस अधीक्षक
-
-
न्यायवैद्यक शास्त्र विभाग:
-
डॉ. विजय जयवंतराव ठाकरे - संचालक
-




