Diwali special buses : दिवाळीसाठी पुणे एसटी विभाग सज्ज! 900 जादा बस धावणार; आतापर्यंत 300 बसचे आरक्षण पूर्ण

काही बसचे आरक्षण 50 टक्क्यांहून अधिक झाले असून, मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रतिसाद अधिक असल्याचे दिसत आहे.

 Diwali special buses : दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे एसटी विभागाने विशेष नियोजन केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी नियमित 300 बससह 900 जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत सुमारे 300 जादा बसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. काही बसचे आरक्षण 50 टक्क्यांहून अधिक झाले असून, मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रतिसाद अधिक असल्याचे दिसत आहे.



स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरीतून जादा बस


नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त राज्याच्या विविध भागांतील नागरिक पुणे आणि परिसरात वास्तव्यास आहेत. दिवाळीच्या सुट्टीत कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्यासाठी अनेक जण आपल्या गावी जातात. त्यामुळे सणाच्या काळात बसस्थानकांवर मोठी गर्दी होते.


ही गर्दी लक्षात घेऊन एसटी विभागाने 900 जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. या बस स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड येथून सोडण्यात येणार आहेत. नियोजनानुसार, शिवाजीनगर येथून 136, स्वारगेट येथून 235, तर पिंपरी-चिंचवड येथून 455 जादा बस धावणार आहेत.



वल्लभनगर आगारातूनही जादा बस


पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारातूनही जादा बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांकडून आगाऊ आरक्षणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवासाचे नियोजन आधीच निश्चित असलेल्या नागरिकांकडून आरक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे ऐनवेळी तिकीट काढण्यासाठी होणारी धावपळ टाळता येणार आहे. जागा उपलब्ध असल्यास ऐनवेळीही प्रवाशांना तिकीट काढून प्रवास करता येईल.



महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत


एसटी महामंडळाकडून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली जाते. तसेच अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. या सवलतींमुळेही एसटी प्रवासाला पसंती मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.


दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी वेगवेगळ्या बसस्थानकांवर विभागली जावी, यासाठी जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांनी शक्यतो आगाऊ आरक्षण करून प्रवासाचे नियोजन करावे. उपलब्ध जागांनुसार ऐनवेळीही प्रवासाची सुविधा मिळू शकेल, असे विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Maharashtra Weather : नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, थंडीची प्रतीक्षा कायम

Maharashtra Weather: राज्यातील हवामानात पुन्हा बदल झाला असून, नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी अपेक्षित थंडी अद्याप जाणवत नाही.

Maharashtra Drought: मराठवाड्यातील उद्योजकांकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 6 कोटींची मदतनिधी, धनादेश मुख्यमंंत्र्यांकडे सुपूर्त

मुंबई: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मराठवाड्यातील उद्योजकांनी पुढाकार घेत आज 6 कोटी 18 लाख रुपयांचा धनादेश आज

Smart Watch Sensor: हातातलं स्मार्टवॉच हृदयाचे ठोके कसं मोजतं? 99.9% टक्के लोकांना माहितीच नाही उत्तर...

मुंबई: सध्याच्या डिजीटल आणि आधुनिक युगात स्मार्टवॉच हे केवळ वेळ पाहण्याचे साधन न राहता प्रत्येकाच्या

What If Oxygen Disappears: फक्त 5 सेकंदासाठी पृथ्वीवरून ऑक्सिजन गायब झाला तर? जगण्याची कल्पना करणंच अशक्य!

मुंबई: मनुष्याला ज्या प्रमाणे, पाणी आणि अन्नाची गरज असते, त्या प्रमाणेच हवेची सुद्धा गरज असते. हवेच्या

छत्रपती संभाजीनगरला 34 एसी इलेक्ट्रिक बसची भेट! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, आरामदायी व पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने छत्रपती

केंद्र सरकारकडून राज्यांना दिवाळी भेट; महाराष्ट्राच्या वाट्याला 7 हजार कोटी!

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं देशातील सर्व राज्यांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. दिवाळीच्या आधी केंद्र सरकारने सर्व