सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना तातडीने मुंबईत बोलावले; नाराजीची चाचपणी होणार?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. मुंबईतील देवगिरी निवासस्थानी मंगळवारी सायंकाळी सात वाजता ही बैठक होणार आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. मुंबईतील देवगिरी निवासस्थानी मंगळवारी सायंकाळी सात वाजता ही बैठक होणार आहे. तब्बल चार महिन्यांनंतर पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक होत असून, त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवारी रात्री पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर या घडामोडींना वेग आला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेऊन पक्षातील निर्णयप्रक्रियेत आपल्याला डावलले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीबाबतही या नेत्यांनी शाह यांच्याकडे तक्रार केली. पक्षातील महत्त्वाच्या नियुक्त्या आणि निर्णय घेताना ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची त्यांची तक्रार असल्याचे सांगितले जाते. या भेटीत राज्याचे अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावे, या मागणीवरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.



अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे अर्थ खाते भाजपकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याचा कार्यभार सांभाळत आहेत. हे खाते पुन्हा राष्ट्रवादीकडे यावे, अशी पक्षातील नेत्यांची अपेक्षा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत अर्थ खात्याचा मुद्दा उपस्थित झाल्याचे समजते. दरम्यान, सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सर्व आमदारांना मुंबईत बोलावले आहे. पक्षातील नाराजी, निर्णयप्रक्रिया, संघटनात्मक बाबी आणि आगामी राजकीय भूमिका यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, बैठकीचा अजेंडा किंवा संभाव्य निर्णयांबाबत पक्षाकडून तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या बैठकीत नेमके कोणते निर्णय होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

दिवाळीच्या काळात अन्नभेसळीविरोधात FDA ची मोठी कारवाई! 19.01 कोटींचा अन्नसाठा जप्त; अनेक व्यावसायिकांचे परवाने निलंबित

मुंबई : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न मिळावे, यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व औषध

Diwali Gold Rate 2026: दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या भावाने घेतली मोठी झेप; भाव ऐकून बसेल धक्का!

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अशातच सोन्या-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी आणि

शेअर बाजाराचा 'टर्निंग पॉईंट'! एका बातमीने बाजारातील मरगळ झटकली, नेमकं काय घडलं?

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची एका दिवसात चांदी झाली. कारण सोमवारचा दिवस शेअर बाजारासाठी महत्त्वाचा ठरला.

Green Crackers : हरित फटाके म्हणजे काय? सामान्य फटाक्यांपेक्षा किती सुरक्षित?

दिवाळीचा सण म्हणजे रोषणाई, आनंद आणि उत्साहाची उधळण. पण यासोबतच आतिशबाजीमुळे होणारे प्रदूषण आणि त्यामुळे

Pune Metro : पुणेकरांसाठी मोठा दिलासा! उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते २१,८०० कोटींच्या मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन

हिंजवडी ते शिवाजीनगर ‘पिंक लाईन’ प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल पुणे : पुणे शहराच्या नागरी

Ramayan Advance Booking : 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! रिलीजच्या आधीच विकली गेली १३ लाखांहून अधिक तिकिटे

मुंबई : रणबीर कपूर, (Ranbir Kapoor) साई पल्लवी (Sai Pallavi) आणि 'रॉकिंग स्टार' यश (Yash) यांची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतिक्षीत 'रामायण'