मुंबई : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिचा आगामी आणि अतिशय उत्सुकतेचा विषय असलेला 'मायसा' (Maaysa) या चित्रपटातील पहिलंवहिलं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'ओ मायसा रे' (O Maaysa Re) असे या गाण्याचे नाव असून, यामध्ये रश्मिकाचा आजवर कधीही न पाहिलेला असा एकदम आक्रमक आणि रौद्र (रागीट) अवतार पाहायला मिळत आहे. या गाण्यातील तिचा संताप, धाडस आणि रागीट तांडव पाहून चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता कैक पटीने वाढली आहे. विशेष म्हणजे, भारताचा पहिला महिला-प्रधान (Female-led) पॅन-इंडिया सिनेमा म्हणून ओळखला जाणारा हा चित्रपट येत्या २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.
'ओ मायसा रे' गाण्याची सोशल मीडियावर धूम
मुंबई (सुहास शेलार): दुष्काळ, अतिवृष्टी आणि अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसह नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत केंद्र ...
सोशल मीडियावर हे गाणे शेअर करताना रश्मिकाने अत्यंत जोशपूर्ण कॅप्शन लिहीली आहे. ती म्हणाली, "ओ मायसा रे!! हा युद्धाचा नारा आहे, वेदना आणि संतापाची एक हाक आहे, एक जागृती आहे!" हे दमदार गाणं प्रसिद्ध संगीतकार जेक्स बिजॉय यांनी संगीतबद्ध केले असून, गायिका सिंधुजा श्रीनिवासन यांनी आपल्या सुरेल पण भारदस्त आवाजात ते गायले आहे. गाण्यात वापरलेले जबरदस्त बीट्स आणि शेवटपर्यंत टिकून राहणारी हाय-व्होल्टेज एनर्जी प्रेक्षकांना खिळवून ठेवते. गाणे रिलीज झाल्यापासूनच रश्मिकाचा हा अनोखा लूक सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
बाप-बेटीच्या अनोख्या नात्यावर आधारित चित्रपटाची कथा
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने जुलै-सप्टेंबर २०२६ या आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. या तिमाहीत बँकेचा स्वतंत्र ...
यापूर्वी भारतीय चित्रपटसृष्टीत 'बाहुबली' किंवा 'केजीएफ' सारख्या मोठ्या मास-नॉनस्टॉप चित्रपटांमध्ये प्रामुख्याने 'आई आणि मुलगा' यांच्यातील भावनिक बंध मोठ्या पडद्यावर झळकले आहेत. मात्र, 'मायसा' हा चित्रपट या सर्व गोष्टींपेक्षा अगदी हटके असणार आहे. आदिवासी पार्श्वभूमीवर आधारित या कथेत एका बाप आणि लेकीच्या नात्यातील घट्ट बॉण्डिंग आणि त्यांचा भावनिक प्रवास मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे, जो या सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. यापूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या टीझरलाही देशभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला होता.
रश्मिकाचे डोळे दीपवणारे 'तांडव' नृत्य
या गाण्यात रश्मिका मंदाना हिने अत्यंत निर्भय, रागीट आणि हाय-इंटेंसिटी असलेल्या 'तांडव' अंदाजात जबरदस्त डान्स परफॉर्मन्स दिली आहे. तिच्या चेहऱ्यावरील क्रूर आणि रागीट हावभाव, अंगात भिनलेला संताप आणि जबरदस्त कोरिओग्राफी पाहून प्रेक्षकांची नजर मोबाईल किंवा टीव्हीच्या स्क्रीनवरून हटत नाही. या गाण्यातील आदिवासी संस्कृतीचा माहौल आणि रश्मिकाची ताकदवान अभिनय शैली हे स्पष्टपणे दाखवून देते की, या मोठ्या बजेटच्या प्रोजेक्टचे नेतृत्व करण्यासाठी तीच सर्वोत्तम निवड का आहे.
दिग्दर्शक रवींद्र पुल्ले यांचा थ्रिलर सिनेमा
या संगीताविषयी सांगायचे तर, संगीतकार जेक्स बिजॉय यांच्या पार्श्वसंगीताची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. मातीशी जोडलेली कथा आणि अस्सल देसी बाज या गाण्यातून स्पष्ट जाणवतो. आदिवासी संगीताची पारंपरिक लय आणि मॉडर्न बीट्सचे जबरदस्त मिश्रण मनावर राज्य करते. 'अनफॉर्मुला फिल्म्स'च्या बॅनरखाली तयार झालेला आणि रवींद्र पुल्ले यांनी दिग्दर्शित केलेला हा एक अप्रतिम इमोशनल ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. भव्य व्हिज्युल्स आणि रश्मिका मंदानाचा दमदार अभिनय प्रेक्षकांना सिनेमागृहात खिळवून ठेवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.