Tuesday, November 3, 2026

Sangli : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर, गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळला

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीत जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला आहे. मिरजेतील मार्केट यार्ड परिसरात जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू होती. आठ टेबलवर २५ कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही प्रक्रिया पार पडली. बँकेच्या एकूण जागांपैकी १५ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित सहा जागांसाठी १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

गोपीचंद पडळकरांचा जत सोसायटी गटातून विजय

जत सोसायटी गटातील निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार विनोद पवार यांच्यावर मात केली. पडळकर यांना ५४ मते, तर विनोद पवार यांना ३४ मते मिळाली. अशा प्रकारे पडळकर यांनी २० मतांच्या फरकाने विजय मिळवला. पडळकर यांच्या विजयाची माहिती समोर येताच समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष सुरू केला. मिरज मिशन चौकात जेसीबीच्या माध्यमातून गुलालाची उधळण, डॉल्बीचा दणदणाट आणि क्रेनच्या साहाय्याने भव्य हार घालण्याची तयारी करण्यात आली आहे. . जिल्हा बँकमध्ये गोपीचंद पडळकर यांची आता दणदणीत एन्ट्री झाली आहे. मोठ्या मताधिक्क्याने पडळकर निवडून आले.

पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच

गोपीचंद पडळकर विरुद्ध महाविकास आघाडीचे विनोद पवार यांच्यात लढत होती. अखेर पडळकरांनी या निवडणुकीत बाजी मारली. पडळकरांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्रावर त्यांच्या समर्थकांचा जल्लोष बघायला मिळत आहे. गुलाल उधळून हा जल्लोष केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ही निवडणूक चर्चेत होती.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >