
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट चर्चेचे आव्हान दिले होते. या आव्हानावर आता देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कर्नाटकात एका जाहीर सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी राहुल गांधींवर कडाडून टीका केली आणि संसदेत किंवा पत्राद्वारे चर्चेचे आव्हान स्वीकारण्याची तयारी दर्शवली. अमित शाह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटले की, "राहुल गांधींना माझे आव्हान आहे, यासाठी थेट नरेंद्र मोदींची गरज नाही. जर तुम्हाला चर्चा करायची असेल, तर एक पत्र लिहा. आम्ही 'एसआयआर' (SIR) वर चर्चेसाठी संसदेचे विशेष सत्र बोलावण्यास तयार आहोत." पुढे बोलताना त्यांनी आरोप केला की, लोकशाहीत चर्चेसाठी संसद हे स्थान आहे, परंतु राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष संसद चालू देत नाही. संसदेत हंगामा करणे आणि कामकाजावर बहिष्कार टाकणे ही काँग्रेसची संस्कृती बनली आहे, असा घणाघात त्यांनी केला.
मुंबई (सुहास शेलार): विधान परिषद निवडणुकीतील निकालानंतर महायुतीतील घटक पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ...
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, देशातील 60-60 जिल्ह्यांमध्ये 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ' रॅलीने राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी संसद, सभापती आणि न्यायालयाचा अपमान करतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला. निवडणुकांमधील पराभवाचे खापर राहुल गांधी आता निवडणूक आयोगावर फोडत आहेत आणि ते पूर्णपणे बाउन्सर झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. भाषणादरम्यान घुसखोरीच्या मुद्द्यावर बोलताना अमित शाह म्हणाले की, "तीन कोटी लोकांनी राहुल गांधींना त्रस्त केले आहे आणि हे तीन कोटी लोक घुसखोर आहेत, ज्यांना काँग्रेस पक्षाने आश्रय दिला आहे." पंजाबमधील शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही लक्ष्य केले. "सरकार कशी चालवावी, हे नायब सिंह सैनी यांच्याकडून शिकावे," असा सल्ला त्यांनी दिला.
काँग्रेसच्या निवडणूक भूमिकेवर बोलताना अमित शाह म्हणाले की, "ज्या राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष निवडणुका जिंकतो, तिथे मतदारयाद्या चांगल्या असतात आणि जिथे त्यांचा पराभव होतो, तिथे मतदारयाद्या आणि ईव्हीएम (EVM) खराब असतात." तसेच, राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर निशाणा साधत त्यांनी जनतेला त्यांच्या सर्व परदेश दौऱ्यांचा हिशोब देण्याचे आव्हान दिले.





