
मुंबई (सुहास शेलार): विधान परिषद निवडणुकीतील निकालानंतर महायुतीतील घटक पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत चव्हाण यांनी निवडणुकीतील कामाचा अहवाल शाह यांच्यासमोर मांडल्याचे समजते. महायुतीतील अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून आघाडी अभेद्य राखण्याबरोबरच महाविकास आघाडीकडून मांडण्यात येणारे नॅरेटिव्ह खोडून काढा आणि विरोधकांना जशास तसे प्रत्युत्तर द्या, अशा सूचना शाह यांनी चव्हाण यांना केल्याची माहिती आहे.(MAHAYUTI )
पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे. तिथल्या नागरिकांनी पाकिस्तान सरकारविरुद्ध बंड पुकारलं आहे. ...
विधानपरिषद निवडणुकीपूर्वी उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाले होते. पुणे शिक्षक मतदारसंघात दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिल्याने महायुतीतील विसंवाद उघड झाला होता. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपला विजय मिळाला असला, तरी पदवीधर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदाराचा पराभव झाला.(RESOLVE DIFFERENCES)
Delhi: दिल्लीयेथे इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या 9 वर्षांच्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. ही विद्यार्थिनी दिल्ली येथील लव्हली हेरिटेज स्कूल या ...
निकालानंतर भाजपचे नवनाथ बन यांनी महायुतीच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत शिवसेनेला लक्ष्य केले. त्याला शिवसेनेच्या नेत्यांनीही प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही पक्षांतील तणाव वाढला होता. भाजपच्या प्रमुख नेत्यांवरही टीका करण्यात आली. त्यामुळे महायुतीतील मतभेद सार्वजनिक पातळीवर आल्याचे चित्र निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर शाह यांनी महायुतीतील एकजूट कायम ठेवण्यावर भर दिल्याचे सांगण्यात येते. विरोधकांकडून मांडण्यात येणाऱ्या राजकीय नॅरेटिव्ह प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्याची आणि महायुती म्हणून एकत्रितपणे विरोधकांचा सामना करण्याची सूचना त्यांनी केली.(UNITED OPPOSITION)






