Friday, November 6, 2026

Komal Punjabi : कायदा अधिकारी कोमल पंजाबी यांना पदावरून तात्पुरते केले बाजूला...

संयुक्त कायदा अधिकारी सुखश्री मोदले यांच्याकडे सोपवला अतिरिक्त कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

बोरीवली पूर्व येथील बेस्ट बस स्थानकासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील अतिक्रमण न हटवल्यामुळे न्यायालयाच्या निर्देशांचे अवमूल्यन झाल्याने महापालिका प्रशासनाच्या वतीने महापालिका कायदा अधिकारी कोमल पंजाबी आणि आर मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल तांबे प्रमुख या नात्याने कारणे दाखवा नोटीस बजावली असतानाच शुक्रवारी पंजाबी यांना पदावरून बाजूला करण्यात आहे. विधी विभागाच्या कायदा अधिकारी या पदाचा भार संयुक्त कायदा अधिकारी सुखश्री मोदले यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

बोरीवली पूर्व येथील स्वामी विवेकानंद मार्गावर बेस्ट बस स्थानकासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील अतिक्रमण न हटवल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना ५ लाख रुपयांचा दंड आणि नोव्हेंबरचे वेतन रोखण्याचे निर्देश दिल्यानंतर महापालिकेने त्या भूखंडावरील अतिक्रमण हटविले. परंतु, न्यायालयाच्या निर्देशाचे पालन न करता अवमूल्यन करण्यात आल्याने महापालिकेच्या कायदा अधिकारी कोमल पंजाबी आणि आर मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल तांबे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही नोटीस दिलेली असतानाच कायदा अधिकारी कोमल पंजाबी यांच्याकडील या पदाचा भार काढून घेत त्यांच्याकडील पदाचा कार्यभार संयुक्त कायदा अधिकारी सुखश्री मोदले यांच्याकडे स्वतःच्या पदासह अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >