
Navi Mumbai: नवी मुंबईतील गजबजलेल्या कळंबोली (Kalamboli) या परिसरातील रोडपाली येथे नाकाबंदी दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भरधाव स्विफ्ट डिझायर (Swift Dzire) कारने पोलीस कॉन्स्टेबल दिलीप भोई यांना धडक दिली आणि त्यांना बोनेटवर तब्बल २०० मीटरपर्यंत फरफटत नेले, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. नियमित नाकाबंदीदरम्यान वाहनांची तपासणी करण्यात येते. त्याच वेळी एका पोलीस कर्मचाऱ्यालाच एका कारने जोरदार धडक दिली. मोटार थांबविण्याचा इशारा देऊनही चार चालकाने पोलसांच्या अंगावर कार नेली.
चालकाने गाडी न थांबवता या पोलिसाला बोनेटवर तब्बल २०० मीटरपर्यंत फरफटत नेले. या थरारक आणि भीषण घटनेमुळे नवी मुंबई पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कळंबोली परिसरात पोलीस पथक नेहमीप्रमाणे नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करत होते. रात्रीच्या वेळी संशयित वाहनांची तपासणी सुरु असताना काळ्या काचा असलेल्या कारच्या चालकाने पोलसांच्या सूचनांचे दुर्लक्ष करून पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रकार घडला.
Marathi Entertainment News: मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या ...
कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला होता. मात्र, खाकीचा कोणताही धाक न ठेवता चालकाने थेट समोर उभ्या असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल दिलीप भोई यांचे म्हणणे न ऐकता कार पुढे घेतली त्यामुळे कॉन्स्टेबल भोई हे कारच्या बोनेटवर फेकले गेले. तरीही याची पर्वा न करता नराधम चालकाने कार वेगाने पुढे नेली व बोनेटवर अडकलेल्या कॉन्स्टेबल यांना त्याच स्थितीत तब्बल २०० मीटरपर्यंत फरफटत नेले व तेथून पळ काढला.
View this post on Instagram
या अपघातात पोलीस कॉन्स्टेबल दिलीप भोई हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या स्विफ्ट डिझायर गाडीवर असलेला नंबर प्लेट ही बनावट असल्याचे तपासात समोर आले आहे. सध्या कळंबोली पोलीस ठाण्यात या अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या मदतीने फरार कार आणि आरोपींचा कसून शोध सुरू आहे. शिवाय गाडीत दोन व्यक्ती बसल्या होत्या. त्यामुळे ते दोन व्यक्ती कोण होते? बनावट नंबर प्लेट लावण्याचे कारण काय, या आधी त्यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी होती का? कार कोणत्या गुन्ह्यासाठी वापरण्यात आली होती का? अशा वेगवेगळ्या मुद्यांवरही पोलिस तपास करत आहेत.





