दिल्लीच्या व्यापार मेळ्यात झळकणार महाराष्ट्राचा वैभवशाली वारसा; 14 नोव्हेंबरला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दालनाचे उद्घाटन

नवी दिल्लीतील प्रगती मैदानात सुरू होणाऱ्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्राच्या भव्य दालनाचे 14 नोव्हेंबरला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, यादरम्यान राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि औद्योगिक प्रगतीचे दर्शन घडणार आहे.

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत आयोजित यंदाच्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात 'भागीदार राज्य' म्हणून सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या भव्य दालनाचे उद्घाटन येत्या शनिवारी (14 नोव्हेंबर) सायंकाळी 4 वाजता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. दिल्लीतील प्रगती मैदान येथे 14 ते 24 नोव्हेंबर दरम्यान हा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा भरत असून यादरम्यान महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, औद्योगिक प्रगती आणि विकासाचा प्रवास देश-विदेशातील नागरिकांसमोर मांडला जाणार आहे.


या महत्त्वाच्या उद्घाटन सोहळ्यास उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप कवाडे, व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, उद्योग आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.



'विकास आणि वारसा' संकल्पनेतून महाराष्ट्राचे दर्शन


महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या या भव्य दालनात एकूण 64 कक्षांचा समावेश आहे. ‘विकास आणि वारसा - महाराष्ट्राचा समृद्ध वारसा, उद्यमशीलता आणि आधुनिक प्रगतीचा संगम’ ही या दालनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक वाडा वास्तुशैलीवर आधारित या दालनाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज, जोतिराव फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करणारी शिल्परचना साकारण्यात आली आहे. दालनात कोल्हापुरी चप्पल, सोलापुरी चादरी, पैठणी, हस्तकला, वस्त्रोद्योग, लाकडी खेळणी, बंजारा कला, पारंपरिक धातूकाम, दागिने आणि भौगोलिक मानांकन (GI Tag) प्राप्त उत्पादनांचे प्रदर्शन मांडले जाणार असून विणकाम व सूत कताईचे थेट प्रात्यक्षिकही पाहता येईल. तसेच 'महाराष्ट्र कनेक्टिव्हिटी हब' आणि 'महाराष्ट्र मानबिंदू' या विभागांच्या माध्यमातून राज्याच्या पायाभूत व औद्योगिक विकासाचे दर्शन घडवले जाईल.



24 नोव्हेंबरला 'द फोक आख्यान' सोहळा


महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारा ‘द फोक आख्यान’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 3:30 वाजता भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटर, प्रगती मैदान येथील ओपन ॲम्फीथिएटरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे. दरम्यान, इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (आयटीपीओ) आयोजित 45 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-2026 चे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते शुक्रवारी (13 नोव्हेंबर) होणार आहे. 14 ते 18 नोव्हेंबर हे दिवस व्यावसायिक अभ्यागतांसाठी, तर 19 ते 27 नोव्हेंबर दरम्यान मेळा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला राहणार आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadanvis: कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारी पिके विकसित करा; देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

नागपूर: रामटेक तालुक्यातील कवडक येथे दत्ता मेघे फाऊंडेशन नागपूरद्वारा संचालित स्व. दत्ता मेघे स्मृती दालन,

आपण निसर्गाचे मालक नाही, तर त्याचा एक भाग; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

मुंबई : "निसर्गावर माणसाचे स्वामित्व नसून, माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे. जैवविविधता आणि पर्यावरणाचे संतुलन

Mumbai Bomb Threat: मुंबई-पुण्याला बॉम्बस्फोटाची धमकी! महापौर कार्यालयासह 5 ठिकाणे रडारवर

Mumbai Bomb Threat: मुंबईसह पुण्यातदेखील बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा मेल आला आहे. मुंबईमध्ये महापौरांच्या कार्यालयाचा

Amul milk price hike : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री; अमूल दूध, सर्फ एक्सेल आणि गोल्ड फ्लेक महागले, जाणून घ्या नवे दर

मुंबई : गेल्या काही महिन्यांत दैनंदिन वापरातील अनेक महत्त्वाच्या वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य

फटाके फोडायला गेला अन् 50 फूट खोल दरीत कोसळला, पनवेलमध्ये 16 वर्षीय मुलाचा थरारक बचाव

दिवाळीचा आनंद साजरा करताना एक क्षणाचा निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो, याचा धक्कादायक अनुभव पनवेलमध्ये एका

Teacher Promotion Stay: जिल्हा परिषद शिक्षकांच्या पदोन्नतीला तूर्त स्थगिती

मुंबई(सुहास शेलार): राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला तूर्त स्थगिती देण्याचे