
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय कार्यालयात आयोजित दिवाळी स्नेहसंमेलनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळी तसेच छठ सणाच्या शुभेच्छा दिल्या. पत्रकारांच्या धावपळीच्या कामाचा उल्लेख करत त्यांनी हलक्याफुलक्या शब्दांत टिप्पणीही केली.
भारत न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना पावसामुळे रद्द झाला आणि भारताची 2-0 ची आघाडी कायम राहिली. पण चौथ्या वनडे सामन्यापूर्वी भारतीय संघ दोन गटात ...
'ब्रेकिंग न्यूजच्या घाईतून वेळ काढून आलात'
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सणासुदीच्या काळात प्रत्येकजण आपल्या कुटुंबीयांसोबत आणि जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, पत्रकारांचे कामाचे स्वरूप वेगळे असून बातम्यांच्या शोधात त्यांची सतत धावपळ सुरू असते.
ते म्हणाले, "दिवाळीचा सण नुकताच पार पडला असून आता छठची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या सणांसाठी मी तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबीयांना शुभेच्छा देतो."
पत्रकारांच्या व्यस्त वेळापत्रकावर बोलताना त्यांनी म्हटले की, ब्रेकिंग न्यूज मिळवण्यासाठी पत्रकारांची सतत धावपळ सुरू असते. असे असतानाही सर्वांनी या 'नॉन-ब्रेकिंग न्यूज' कार्यक्रमाला उपस्थिती लावली, याबद्दल त्यांनी आभार मानले.
फॅक्सपासून इन्स्टाग्राम रील्सपर्यंतचा प्रवास
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी माध्यम क्षेत्राशी असलेल्या आपल्या जुन्या संबंधांनाही उजाळा दिला. प्रसिद्धीपत्रकांपासून ते इन्स्टाग्राम रील्सपर्यंत माध्यमांमध्ये झालेला बदल आपण जवळून पाहिल्याचे त्यांनी सांगितले.
1990 च्या दशकाच्या सुरुवातीला दोन मोठ्या दौऱ्यांसाठी देशभरातील व्यवस्था करण्याची जबाबदारी आपल्याकडे होती, अशी आठवण त्यांनी सांगितली. त्या काळात एखादे प्रसिद्धीपत्रक पाठवण्यासाठीही फॅक्स मशीन शोधावे लागत असे, असे ते म्हणाले.
पत्रकार म्हणून काम करताना आणि नंतर सरकारमध्ये जबाबदारी सांभाळताना भूमिका कशा बदलतात, यावरही त्यांनी भाष्य केले. गेल्या महिन्यात सरकारप्रमुख म्हणून आपली 25 वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख करत त्यांनी पत्रकारांशी असलेल्या जुन्या संबंधांची आठवण करून दिली.
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाबाबतचा जुना किस्सा
भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी 11 अशोक रोडवरील वास्तव्याचा एक जुना किस्साही सांगितला. ते एका खोलीत राहत असताना अचानक पत्रकारांचा एक गट त्यांच्या खोलीत आला होता. त्यावेळी काही महिला पत्रकारांनी त्यांना मिठाई खाऊ घालण्यास सांगितले.
त्यामागचे कारण विचारल्यावर, 'तुम्ही गुजरातला जाणार आहात आणि मुख्यमंत्री होणार आहात,' असे त्यांनी सांगितल्याची आठवण मोदी यांनी सांगितली. ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत होती, मात्र पत्रकारांना त्याची आधीच माहिती मिळाली होती. पुढे त्यांचा अंदाज खरा ठरल्याचेही मोदी म्हणाले.






