IND vs NZ 5th ODI Live Streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा वनडे सामना कधी आणि कुठे पाहायचा? जाणून घ्या
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना होत आहे. हा सामना निर्णायक असून मालिका विजयाचं गणित सोडवणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. चला जाणून घेऊयात हा सामना कधी आणि कुठे पाहायचा ते..
November 14, 2026 03:53 PM
IND vs NZ 5th ODI Live Streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा वनडे सामना कधी आणि कुठे पाहायचा? जाणून घ्या (Photo: BCCI Twitter)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. चार सामन्यानंतर मालिकेत 2-1 अशी स्थिती आहे. भारताने सुरूवातीचे सलग दोन सामन्यात विजय मिळवून आघाडी घेतली आहे. तर तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला आणि न्यूझीलंडचं मालिका विजयाचं गणित फिस्कटलं. चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने जोरदार कमबॅक केलं आणि 244 धावांनी पराभूत केलं. आता भारताला मालिका विजयासाठी आणि न्यूझीलंडला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी शेवटचा सामना जिंकणं भाग आहे. त्यामुळे पाचवा सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. चौथ्या वनडे सामन्यात मॅट हेनरी भारताचा दाणादाण उडवून दिली होती. त्याने एकट्याने टीम इंडियाच्या सहा विकेट काढल्या होत्या. पण शेवटच्या वनडे सामन्यात खेळणार नसल्याने टीम इंडियाला दिलासा असणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी मॅट हेनरी वेलिंग्टनला रवाना झाला आहे. दुसरीकडे, गुरनूर ब्रार शेवटच्या वनडे सामन्यात नसेल. कसोटी मालिकेसाठी त्याची निवड कुलदीप यादवच्या जागी केली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा वनडे सामना केव्हा आणि कुठे होणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील पाचवा वनडे सामना रविवार, 15 नोव्हेंबर रोजी माउंट माउंगानुई येथील बे ओव्हलवर खेळला जाईल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा वनडे सामना किती वाजता सुरू होईल?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा एकदिवसीय सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर नाणेफेकीचा कौल हा अर्धा तास आधी म्हणजेच 7 वाजता होईल.