Saturday, November 14, 2026

Yash Raj Films: रोमँटिक हिरो आता हॉरर भूमिका साकरणार; वरुण धवनच्या नव्या चित्रपटाची घोषणा

YRF Horror Film: यश राज फिल्म्सने पहिल्यांदाच हॉरर चित्रपट निर्मितीची घोषणा केली आहे. वरुण धवन मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभय पन्नू करणार असून, 2028 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.

बॉलिवूडमध्ये सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपटांची निर्मिती होत आहे. प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याच्या प्रयत्नात आता यश राज फिल्म्सनेही एक वेगळे पाऊल उचलले आहे. रोमँटिक आणि ॲक्शनसाठी ओळखली जाणारे यश राज प्रोडक्शन आता थेट हॉरर चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी सज्ज झाले आहे. या नव्या चित्रपटासाठी अभिनेता वरुण धवनची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे वरुणचा हा नवा अंदाज पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

YRF चा पहिलाच हॉरर चित्रपट

यश राज फिल्म्सने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा करत मनोरंजनविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे, प्रोडक्शनच्या चित्रपट प्रवासात पहिल्यांदाच हॉरर प्रकारातील चित्रपटाची भर पडणार आहे. आतापर्यंत विविध विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या YRF कडून आता हॉरर चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे या चित्रपटातून प्रेक्षकांना नेमका कसा अनुभव मिळणार, याबाबत उत्सुकता आहे.(VarunDhawan)

वरुण धवन साकारणार मुख्य भूमिका

या चित्रपटात वरुण धवन मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. आपल्या अभिनयातून वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या वरुणसाठी हा चित्रपट महत्त्वाचा ठरू शकतो. यापूर्वी त्याने 'भेडिया' या चित्रपटातून हॉरर-कॉमेडी प्रकारात काम केले होते. आता मात्र YRF च्या पहिल्या हॉरर चित्रपटातून तो प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे त्याची भूमिका नेमकी कशी असेल, याची चर्चा सुरू झाली आहे.(YRF)

दिग्दर्शनाची जबाबदारी अभय पन्नूंकडे

या चित्रपटाचे दिग्दर्शन अभय पन्नू करणार आहेत. 'रॉकेट बॉईज' या वेब सीरिजमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. या चित्रपटाची कथा आणि पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. आदित्य चोप्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पुढे जाणार असून, अक्षय विधानी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

2028 मध्ये चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. हा चित्रपट 31 मार्च 2028 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, सध्या चित्रपटाचे नाव, कथानक आणि इतर कलाकारांची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वरुण धवनचा हा आगामी चित्रपट नेमकी कोणती भयकथा घेऊन येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.(VarunDhawanNewMovie)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >