U19 Asia Cup 2026 , IND vs PAK: अंतिम षटकात मनात काय विचार सुरू होते? मोहित उलवाने विजयानंतर मनातलं सांगितलं
अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर मात दिली. या विजयाचा शिल्पकार ठरला तो मोहित उलवा.. त्याने शेवटच्या चेंडूवर चौकार मारला आणि भारताला विजय मिळवून दिला. विजयानंतर मोहित उलवाने आपल्या मनातलं सांगितलं.
November 14, 2026 07:47 PM
U19 Asia Cup 2026 , IND vs PAK: अंतिम षटकात मनात काय विचार सुरू होते? मोहित उलवाने विजयानंतर मनातलं सांगितलं (Photo: BCCI Twitter)
अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात एक क्षण असा होता की भारताच्या हातून हा सामना गेला. पण मोहित उलवाने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली आणि भारताला विजयाची चव चाखली. त्याने 26 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार मारत नाबाद 49 धावांची खेळी केली. या खेळीतील शेवटचा चौकार हा विजयी ठरला. एका चेंडूत तीन धावांची गरज असताना मोहित उलवाने चौकार मारला आणि भारताला विजय मिळवून दिला. मोहित उलवा या खेळीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.
काय म्हणाला मोहित उलवा?
अंतिम षटकात मनात काय विचार सुरू होते? असा प्रश्न मोहित उलवाला विचारला तेव्हा त्याने सांगितलं की, 'फार काही नाही. माझा स्वतःवर विश्वास होता आणि देवावर श्रद्धा होती. माझा आशिया चषक फारसा चांगला गेला नव्हता. मला माहित होते की मी एक गोलंदाज आहे, पण मी एक अष्टपैलू खेळाडू आहे यावरही माझा विश्वास होता. मात्र, मला स्वतःला सिद्ध करण्याची पुरेशी संधी अद्याप मिळाली नव्हती. तरीही, मी हे करू शकतो असा मला नेहमीच विश्वास वाटायचा. मला फक्त मनालच्या साथीची गरज होती. माझ्याआधी फलंदाजीला जाऊन त्याने जी गती तयार केली आणि डावाची जशी बांधणी केली, ती अविश्वसनीय होती. मला फक्त तिथे जाऊन माझी कामगिरी पूर्ण करायची होती.'
एसीसी आशिया कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि ...
विजयी धावा काढण्याबाबत मोहित उलवा म्हणाला की, 'फार काही विशेष नव्हते. मी फक्त त्या एका चेंडूची वाट पाहत होतो. मला माहित होते की मी चौकार मारून सामना जिंकवून देऊ शकतो. माझा देवावर पूर्ण विश्वास होता. आज माझा दिवस आहे आणि मीच सामना संपवणार, हे मला माहित होते. माझा स्वतःवर नेहमीच विश्वास राहिला आहे. मी स्वतःला सतत सांगत असतो की, "मी हे करू शकतो, मी हे करणारच आणि अगदी शेवटपर्यंत हे पूर्ण करून दाखवणार." आणि वेंकटबद्दल बोलायचे तर, त्याने मला विशेषतः खूप आत्मविश्वास दिला. तो मला सतत सांगत होता की, "नाही, तू हे करू शकतोस. फक्त जा आणि खेळ. तूच सामना जिंकवून देशील." शेवटच्या चेंडूवर आपण दोघे मिळून हे काम पूर्ण करू शकतो, हा जो विश्वास त्याने मला दिला, त्यामुळे माझा स्वतःवरचा विश्वास अधिकच दृढ झाला. मी जर शेवटच्या चेंडूपर्यंत तिथे उभा राहिलो, तर सामना जिंकवून देईन, असा मला ठाम विश्वास होता.'