जखमी अग्निशमन जवानाला सत्यम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर नागरिकाला एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. यासंदर्भात, उप अग्निशमन अधिकारी मनीष ब्रह्मंकर यांनी सांगितले की, त्यांना सुरुवातीला एका दुकानात आग लागल्याची माहिती समजली होती. त्यामुळे त्यांनी "रात्री सुमारे साडेदहा वाजताच्या सुमारास, नियंत्रण कक्षाला एका दुकानात आग लागल्याचा फोन आला होता. त्या माहितीच्या आधारे आम्ही तात्काळ अग्निशमन दलाला घटनास्थळी रवाना केले. घटनास्थळी पोहोचल्यावर आमच्या लक्षात आले की, आग दुकानात नसून एका गॅरेज आणि गोदामात लागली होती." ( Kalamboli Steel Market Fire)
Samruddhi Mahamarg : 120 वेगमर्यादेच्या समृद्धी महामार्गावर गुरांचा कळप! वाहनचालकांचा थरकाप, मोठा अनर्थ टळला
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील समुद्धी महामार्गावर दुसरबीड टोल प्लाजा परिसराजवळ नुकताच २ दिवसापूर्वी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात 20 ते 22 ...
तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार, गोदामात कोणती रसायने साठवली आहेत याची अग्निशमन दलाला आधी कल्पना नव्हती. "अचानक एक मोठा स्फोट झाला. नंतर आम्हाला समजले की, आत ठेवलेल्या थिनरच्या अनेक ड्रममुळे हा स्फोट झाला आहे. या स्फोटात आमचा एक अग्निशमन कर्मचारी जखमी झाला आहे. तो 5 ते 6 टक्के भाजला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.", असे उप अग्निशमन अधिकारी मनीष ब्रह्मंकर यांनी माहिती देताना सांगितले. (Garage Fire Incident)
दरम्यान, घटनेपासून गोदामाचा आणि गॅरेजचा मालक बेपत्ता झाला आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात आगीचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Kalamboli Breaking News)