Prahaar Marathi News Live : अमेरिकेत विमानसेवा विस्कळीत! हजारो उड्डाणे रद्द, प्रवाशांचे हाल; तांत्रिक बिघाडामुळे गोंधळ
अमेरिकेतील विमान प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) च्या हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने देशभरातील विमानसेवा विस्कळीत झाली आहे. या समस्येमुळे हजारो विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली असून अनेक विमानांना विलंब होत आहे. विमान कंपन्या सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, रविवार संध्याकाळपर्यंत विमानसेवा पूर्णपणे सुरळीत होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.