Chhatrapati Sambhajinagar : जन्मदात्या वडिलांचं डोकं आधी भितींवर आदळलं नंतर गळा आवळला पुढे... पोटच्या मुलाचं राक्षसी कृत्य

छत्रपती संभाजीनगर : शहरातून एक काळीज सुन्न करणारी घटना घडली आहे. एका ३३ वर्षीय मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याची निर्घृण हत्या केली आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील हमालवाड्यात शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील सातारा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुलाला आपल्या ताब्यात घेतलं आहे. मृतकाचे नाव साहेबराव बाबूराव म्हस्के असून त्यांचे वय ७३ होते. तर याप्रकरणात नराधम मुलगा कैलास साहेबराव म्हस्के (वय ३३) याला अटक करण्यात आली आहे.



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या माहितीनुसार, साहेबराव म्हस्के हे छत्रपती संभाजीनगरमधील रेल्वे स्टेशन परिसरातील हमालवाडा येथे आपल्या कुटुंबासह राहत होते. शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास साहेबराव आणि त्यांचा ३३ वर्षीय मुलगा कैलास यांच्यामध्ये काही घरगुती कारणावरून वाद झाला. आरोपानुसार हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापाच्या भरात कैलासने वडिलांचे डोके भिंतीवर आदळले, धक्कादायक म्हणजे एवढ्यावरच न थांबता त्याने थेट आपल्याच पित्याचा गळा आवळला. या भीषण हल्ल्यात साहेबराव गंभीर जखमी होऊन खाली कोसळले.






घटनेनंतर आरोपी कैलासने तत्काळ घटनास्थळावरून पसार झाला आणि आपल्या भावाला वडिलांसोबत झटापट झाल्याचे सांगितलं. त्यानंतर तात्काळ कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी जखमी साहेबराव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर साहेबराव यांना मृत घोषित केलं.



मुलाच्या हातानेच वडिलांचा अंत ?


दरम्यान, वयोवृद्ध जन्मदात्या पित्याचीच हत्या केल्याने हमालवाडा आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अवघ्या काही वेळातच आरोपी मुलगा कैलास याला ताब्यात घेतले असून, नेमका वाद कशावरून झाला होता, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.


Comments
Add Comment

Pandharpur News : पंढरपूरच्या आंबे गावातील विहीर दुर्घटना; दोन मजुरांचे मृतदेह बाहेर, आणखी दोघांचा शोध सुरू

Solapur News: पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहिरीचा ढिगारा कोसळून चार मजूर गाडले गेल्याच्या दुर्घटनेत आतापर्यंत दोन

Jalgaon : उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी खुशखबर ! उधना-छपरा विशेष रेल्वेला 5 स्थानकांवर थांबा, 16 नोव्हेंबरला धावणार

जळगाव : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना ते छपरा

Farmer ID : फक्त 2 मिनिटांत करा हे काम, नाहीतर खात्यात जमा होणार नाही शेतकरी योजनेचा पैसा

मुंबई : शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता केवळ अर्ज करून चालणार नाही. त्यासाठी ई-केवायसी पूर्ण

UAE Accident : UAE मधील भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू; चार भारतीयांचा समावेश

UAE Accident: संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) फुजैरा येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार

ASEAN Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनिला दौऱ्याला सुरुवात; आसियान आणि क्वाड परिषदांमध्ये होणार महत्त्वपूर्ण चर्चा

ASEAN Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दोन दिवसांच्या फिलिपिन्स दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते आसियान-भारत

Nashik Crime : येवल्यात बंद घर फोडून 12 लाख 99 हजारांचा ऐवज लंपास ! 23 तोळे सोने, रोकड अन्...

नाशिक : येवला शहरातील कासार गल्ली परिसरात घरफोडीची मोठी घटना उघडकीस आली आहे. कुटुंबीय देवदर्शनासाठी बाहेरगावी