Sunday, November 15, 2026

Farmer ID : फक्त 2 मिनिटांत करा हे काम, नाहीतर खात्यात जमा होणार नाही शेतकरी योजनेचा पैसा

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांसह अन्य योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन मदत व पुनर्वसन विभागाने केले आहे.

मुंबई : शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता केवळ अर्ज करून चालणार नाही. त्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे आणि फार्मर आयडी (Farmer ID) तयार असणेही आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांसह अन्य योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन मदत व पुनर्वसन विभागाने केले आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया महत्त्वाची

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात मिळावी, यासाठी अॅग्रीस्टॅक (AgriStack) प्रणालीतील माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर ई-केवायसी आणि फार्मर आयडीची प्रक्रिया महत्त्वाची ठरली आहे.

पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होण्यासाठी त्यांची नोंदणी आणि माहितीची पडताळणी पूर्ण असणे गरजेचे आहे. माहिती अपूर्ण किंवा अद्ययावत नसल्यास योजनेचा लाभ मिळवताना अडचणी येऊ शकतात.

अॅग्रीस्टॅक प्रणालीचा काय फायदा?

शेतकऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी संकलित करून ती अद्ययावत ठेवण्यासाठी अॅग्रीस्टॅक प्रणालीचा वापर केला जात आहे. या प्रणालीतील नोंदींच्या आधारे कृषी विभागासह अन्य सरकारी विभागांच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत होते.

शेतकऱ्यांनी काय करावे?

शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून फार्मर आयडी तयार करून घ्यावा. तसेच अॅग्रीस्टॅक प्रणालीतील नोंदी तपासून त्यामध्ये आवश्यक दुरुस्ती किंवा माहिती अद्ययावत करावी. विशेषतः दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया प्रलंबित ठेवू नये.

सरकारी योजनांमधून मिळणारी आर्थिक मदत, अनुदान आणि इतर लाभ थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी नोंदणीतील माहिती अचूक असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मदत व पुनर्वसन विभागाने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >