
उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपाचा वरचष्मा
उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपाची सत्ता आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात भाजपाची घट्ट पकड आहे. राज्यात तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेसाठी भाजपाचा तयारी सुरू आहे. त्यामुळे विरोधकांना उत्तर प्रदेश निवडणुकीचा पेपर खूपच कठीण आहे. राज्यात विधानसभेच्या 403 जागा असून लोकसभेवर 80 खासदार निवडून जातात. त्यामुळे ही निवडणूक विधानसभेपुरता मर्यादीत नसून त्याचा राष्ट्रीय राजकारणावरही परिणाम दिसून येईल. त्यामुळे भाजपाने आतापासून रणनिती आखण्यास सुरू केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपाची सत्ता आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. निवडणूक समन्वय, तिकीट वाटप, सोशल मीडिया रणनीती, विरोधी पक्षांच्या सार्वजनिक प्रसिद्धीच्या धोरणाला प्रत्युत्तर देणे या रणनितीवर काम सुरू झालं आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप 256, समाजवादी पक्ष 100, अपना दल (एस) 13, राष्ट्रीय लोक दल 9, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 6, निषाद पार्टी 5, अपक्ष 3, काँग्रेस 2, जनसत्ता दल लोकतांत्रिक 2 जागा आहेत.
UP Election 2027: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू, मथुरेच्या बैठकीत पुढची रणनिती ठरणार
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. पुढच्या वर्षी अर्थात 2027 च्या फेब्रुवारी मार्चमध्ये या निवडणुका ...
पंजाबमध्ये आपची सत्ता उलथणार!
पंजाबमध्ये आपची सत्ता असून भगवंत मान हे मुख्यमंत्री आहेत. पण राज्यात सत्ताविरोधी लाट, प्रादेशिक पक्ष आणि शेतकरी राजकारण या दृष्टिकोनातून निवडणुकीकडे पाहिले जाईल. त्यामुळे आपसाठी ही निवडणूक कठीण जाणार आहे. तर भाजपाने राज्यात निवडणुकीच्या दृष्टीने वेगाने पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. पंजाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष केवल सिंग ढिल्लन यांनी राज्य जाहीरनामा समिती आणि राज्य आरोपपत्र समितीची स्थापना केली आहे.जाहीरनामा समितीत पंजाबचे माजी मंत्री, माजी आमदार, खासदार आणि पक्षाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह एकूण 13 सदस्य आहेत. या समितीत मनप्रीत सिंग बादल, अश्वनी शर्मा, मनोरंजन कालिया, सोम प्रकाश, राणा गुरमीत सिंग सोधी, अश्वनी सेखरी, सतनाम सिंग संधू, राघव चढ्ढा, राजिंदर गुप्ता, हरभजन सिंग, परमपाल कौर आणि वकील एच.एस. फुलका यांचा समावेश आहे. आरोपपत्र समितीत पंजाब आणि राष्ट्रीय स्तरावरील अनुभवी नेत्यांसह एकूण 14 सदस्य आहेत.
Assembly Elections 2026 : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार तारखा
Assembly Elections 2026 : देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुका ...





