मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमदार रोहित पवार यांनी केलेले आरोप बालिश आणि खालच्या स्तराचे राजकारण करणारे आहेत. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची प्रतिमा मलिन करू नये, अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी टीका केली. दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातामागील संपूर्ण सत्य समोर यावे आणि या घटनेचा पर्दाफाश व्हावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः प्रयत्नशील असल्याचा दावाही त्यांनी केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, संबंधित विमान कंपनीच्या विमानातून राज्यातील जवळपास ९० टक्के नेत्यांनी प्रवास केला असेल. स्वतः रोहित पवार यांनीही अनेकदा या कंपनीच्या विमानातून प्रवास केला असून, त्यासंदर्भातील छायाचित्रे उपलब्ध आहेत. एखाद्या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास केला म्हणून त्या कंपनीशी संबंधित व्यक्तींशी राजकीय संबंध आहेत, असा निष्कर्ष काढता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणे योग्य नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम रोहित पवार यांना आवडला नसावा आणि त्याचे महत्त्व कमी करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक आरोप केले असावेत, अशी शक्यताही बावनकुळे यांनी व्यक्त केली.
MHT CET 2027: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 11अभ्यासक्रमांच्या CET परीक्षा दोनदा होणार; संभाव्य वेळापत्रक जाहीर
मुंबई: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजेच सीईटी सेलने शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ...
शरद पवार यांनी नेहमीच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपली. त्यांनी प्रसिद्धीचा असा हव्यास कधी दाखवला नाही. रोहित पवार यांनी त्यांच्याकडून राजकीय संस्कृती कशी जपावी, हे शिकण्याची गरज आहे. रोहित पवार यांचे वक्तव्य बालिशपणाचे असून, अशा प्रकारच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची राजकीय उंची कमी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही या आरोपांबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत अजित पवार यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. दोघांनीही एकमेकांना भावाप्रमाणे सांभाळले. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत बोलताना फडणवीस यांच्यावर आरोप करून रोहित पवार महाराष्ट्राची प्रतिमा खराब करत आहेत, असे बावनकुळे म्हणाले. अजितदादांच्या विमान अपघातामागील संपूर्ण सत्य समोर आले पाहिजे आणि या घटनेचा पूर्णपणे पर्दाफाश झाला पाहिजे, ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस स्वतः प्रयत्न करत आहेत. त्यांनी यासंदर्भात काय काय प्रयत्न केले आहेत, याची मला माहिती आहे. मात्र, काही गोष्टी ते सार्वजनिकरीत्या सांगू शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Bharat Gogawale: दुष्काळग्रस्तांना रोजगाराची हमी! पात्र कुटुंबांना कामापासून वंचित ठेवू नका; मंत्री भारत गोगावले यांचे निर्देश
मुंबई: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 'व्हीबी जी राम जी'अंतर्गत घ्यावयाची कामे आणि प्रलंबित देयके यांचा रोहयो मंत्री गोगावले यांनी दूरदृश्यसंवाद ...
अशा आरोपांमुळे फडणवीस यांच्या प्रतिमेवर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, ज्यांच्याशी आमचे पारिवारिक संबंध आहेत, अशा व्यक्तींवर आरोप केले जात असल्याचे दुःख वाटते. अशा व्यक्तींना मानहानीची नोटीस पाठवायची का, असा प्रश्न उपस्थित करत रोहित पवार यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे. राज्यातील जनतेच्या मनात त्यांची प्रतिमा कमी झाली आहे, हीच त्यांच्यासाठी मोठी मानहानी असल्याचा टोला बावनकुळे यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रोहित पवार यांना महत्त्व मिळत नसल्याने ते अशी वक्तव्ये करत असावेत. पक्षात त्यांना कोणी विचारत नसल्यामुळे आणि शरद पवार यांच्या गटातून बाहेर पडण्यासाठी वेगळे राजकीय वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ते अशी भूमिका घेत असावेत, अशी टीकाही त्यांनी केली.
'डिलिमिटेशन'ला सुप्रिया सुळेंचे समर्थन असल्यास स्वागत
मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत (डिलिमिटेशन) खासदार सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचे स्वागत बावनकुळे यांनी स्वागत केले. त्यांनी मांडलेली भूमिका देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आज अनेक लोकसभा मतदारसंघांचे क्षेत्रफळ सुमारे ३०० किलोमीटर, तर विधानसभा मतदारसंघांचे क्षेत्रफळ सुमारे १५० किलोमीटरपर्यंत आहे. काही मतदारसंघांमध्ये लोकसंख्या ४० ते ४५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे मतदारसंघांची पुनर्रचना आवश्यक आहे. विकसित भारताच्या उभारणीसाठी लोकप्रतिनिधींची संख्या वाढणे गरजेचे असून, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण झाल्यास विकासकामांना गती मिळू शकते. त्यामुळे डिलिमिटेशनच्या प्रक्रियेला सुप्रिया सुळे मदत करत असतील, तर त्यांचे अभिनंदन करेन, असे बावनकुळे म्हणाले.