काय म्हणाला अर्शदीप सिंग?
अर्शदीप सिंगला या कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. अर्शदीप सिंगने या खेळीबाबत खुलासा केला आणि विजयाचं गुपित सांगितलं. अर्शदीप सिंग म्हणाला की, "फलंदाजी करताना इशानच्या भागीदारीने एक विशिष्ट वातावरण निर्माण केले होते. मला वाटले की आपण झुंज देऊ शकतो आणि आपल्याला सहज विकेट द्याची नाही. त्यामुळे, तुम्ही संपूर्ण षटक एका टोकाकडून खेळलात आणि इशानने धावा केल्या. मला वाटले की त्या धावा निर्णायक ठरतील." अर्शदीप सिंग पुढे म्हणाला की, "माझा प्रयत्न होता आणि मला त्याची अपेक्षाही होती, कारण त्याने संपूर्ण मालिकेत शॉर्ट बॉल टाकला होता. त्यामुळे, मी त्या चेंडूची वाट पाहत होतो. म्हणून, मी माझी बॅट फिरवली आणि चेंडू कनेक्ट झाला आणि छान मध्यभागी लागला.
मैदानावर पुन्हा 'स्काय' शो! अवघ्या 29 चेंडूंत 82 धावा कुटत मुंबईला मिळवून दिला विजय
[caption id="attachment_1075866" align="aligncenter" width="800"] सूर्यकुमार यादव सध्या टीम इंडियाबाहेर आहे आणि संघात स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे. असं असताना पुन्हा एकदा देशांतर्गत ...
अर्शदीप सिंगने सांगितलं की, भारतासाठी डाव संपल्यानंतर सिराजने या अतिरिक्त धावांवर जोर दिला होता. त्यावेळेस या धावांचं महत्त्व कळलं नाही. पण नंतर सामन्याचं चित्र पाहिलं तर त्या धावांचं महत्त्व कळलं. कारण न्यूझीलंडला 22 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. बीसीसीआय टीव्हीवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत अर्शदीप सिंग म्हणाला की, 'पहिला डाव संपल्यानंतर माझं मोहम्मद सिराजबरोबर याबाबत बोलणं झालं होतं. तेव्हा त्याने सांगितलं होतं की, या धावा खूप महत्त्वाच्या आहेत. मला ते आता काही वाटत नाही. पण सामन्याच्या संदर्भात या धावा खूपच महत्त्वाच्या होत्या. जर तुम्ही सामन्यानंतर पाहिलं तर त्या धावाच गेम चेंजर होत्या.'