मुंबई: शिर्डी विमानतळ परिसरातील पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून पंचतारांकित हॉटेल विकसित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि दी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड म्हणजेच ताज समूह यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे शिर्डी विमानतळ परिसरात विमान प्रवाशांसह देश-विदेशातून येणाऱ्या साईभक्तांना दर्जेदार निवास आणि आदरातिथ्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या सामंजस्य करारासाठी वनमंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
शिर्डी हे देशातील प्रमुख धार्मिक पर्यटनस्थळ आहे. श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक भक्त तेथे दर्शनासाठी येत असतात. शिर्डी विमानतळामुळे या भागाची हवाई कनेक्टिव्हिटी वाढली असून, विमानतळाच्या परिसरात जागतिक दर्जाच्या सुविधा विकसित होईल व पंचतारांकित हॉटेलच्या उभारणीमुळे शिर्डीच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Marathi Serial Updates: झी मराठीवर या आठवड्यात मनोरंजनाचा तडका; पाहा मालिकांमध्ये काय घडणार?
Marathi Serial Updates: मनोरंजन विश्वात प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या झी मराठीवरील मालिकांमध्ये सध्या अनेक मनोरंजक घडामोडी घडताना दिसत आहेत. गुरुकुलला मिळणारी ...
या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी टाटा समूह आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला शुभेच्छा देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ताज समूहासारख्या नामांकित हॉटेल उद्योगसमूहाच्या सहभागामुळे शिर्डी विमानतळासह परिसराच्या विकासाला चालना मिळेल. या प्रकल्पांच्या माध्यमातून पर्यटनवाढीसोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि रोजगारनिर्मितीलाही हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच शिर्डी विमानतळाच्या विकासामुळे शिर्डीच्या धार्मिक पर्यटनाला आणि परिसराच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याने शिर्डी विमानतळाच्या कामालाही अधिक गती द्यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.