Ashish Shelar: रोहित पवारांवर आशिष शेलारांचा घणाघात; म्हणाले, 'हे तर राजकीय नीचपणाच!'

एखादे विधान काय आहे आणि ते विधान कोणी केले आहे, या दोन बाबींचा स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर मी केवळ व्यक्ती म्हणून नव्हे, तर त्या वक्तव्यामागील राजकीय प्रवृत्ती म्हणून प्रतिक्रिया देत आहे. त्यांचे वक्तव्य म्हणजे राजकीय नीचपणा आहे. शक्यतो असे शब्द वापरणे मला आवडत नाही; मात्र या वक्तव्याचे स्वरूप पाहता त्याचे वर्णन यापेक्षा वेगळ्या शब्दांत करता येणार नाही.

Ashish Shelar: भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी अनेक विषयावर आपले मत मांडले. यावेळी रोहित पवार यांच्या आरोपांवरही त्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. एखादे विधान काय आहे आणि ते विधान कोणी केले आहे, या दोन बाबींचा स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर मी केवळ व्यक्ती म्हणून नव्हे, तर त्या वक्तव्यामागील राजकीय प्रवृत्ती म्हणून प्रतिक्रिया देत आहे. त्यांचे वक्तव्य म्हणजे राजकीय नीचपणा आहे. शक्यतो असे शब्द वापरणे मला आवडत नाही; मात्र या वक्तव्याचे स्वरूप पाहता त्याचे वर्णन यापेक्षा वेगळ्या शब्दांत करता येणार नाही, असा प्रहार सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.







मंत्री आशिष शेलार काय म्हणाले?


रोहित पवार यांनी विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात जी भूमिका मांडली, त्याला कोणताही थेट, सबळ किंवा दुबळा पुरावा आहे का? परिस्थितीजन्य पुरावा आहे का? या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. त्यांनी केलेल्या विधानातही कोणतीही स्पष्टता नाही, असे आशिष शेलार यांनी सांगितले. तसेच एखादे कथानक उभे करणे, त्यातून संशयाचे वातावरण निर्माण करणे आणि राजकीय वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करणे, ही राजकीय नीच प्रवृत्ती आहे, असे ॲड. आशिष शेलार यावेळी म्हणाले.


पुढे बोलताना, रोहित पवारांना असे वक्तव्य करण्याची गरज का भासली, याचे कारण त्यांच्या वैफल्यात दडलेले असावे. त्यांच्या पक्षातील नेतृत्वाचा प्रश्न, शरद पवार यांच्याशी संबंधित राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत परिस्थिती यामुळे त्यांच्यात वैफल्यातून चिड निर्माण झाली आहे का, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मात्र, अशा वैफल्यातून निर्माण झालेली चिड व्यक्त होताना खोटे बोलण्याची एक नशा चढते. त्या नशेत व्यक्ती भान हरपून जाते. रोहित पवारांचे वक्तव्य हे अशाच वैफल्यग्रस्त मनःस्थितीतून आलेले असल्याचे दिसते, अशी टिप्पणी ॲड. आशिष शेलार यांनी केली.

Comments
Add Comment

Maharashtra Cabinet Decision: नक्षलवाद्यांनी लुटलेल्या शस्त्रांची माहिती देणाऱ्याला दीड लाखांपर्यंत बक्षीस; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: नक्षलवाद्यांनी यापूर्वी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेली शस्त्रे शोधण्यासाठी माहिती देणाऱ्यांना आता रोख

NCP Maharashtra: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा निर्णय; एक महिन्याचे वेतन देणार!

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला दुष्काळ निवारणासाठी 15 लाखांचा निधी - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक

Cyclone Akvan : महाराष्ट्रात थंडी, ऊन आणि पावसाचा तिहेरी अनुभव; ‘अकवन’ चक्रीवादळामुळे विदर्भात पावसाचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात सध्या हवामानाचे वेगवेगळे रूप पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि घाटमाथ्याच्या भागात

Pandharpur Special Trains : कार्तिकी वारीसाठी भाविकांना दिलासा, मध्य रेल्वेच्या 36 विशेष गाड्या धावणार

विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरकडे निघाले आहेत. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी होणारी गर्दी

Bharat Gogawale: दुष्काळग्रस्तांना रोजगाराची हमी! पात्र कुटुंबांना कामापासून वंचित ठेवू नका; मंत्री भारत गोगावले यांचे निर्देश

मुंबई: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 'व्हीबी जी राम जी'अंतर्गत घ्यावयाची कामे आणि प्रलंबित देयके यांचा रोहयो