
Painjan Song: पैंजणाच्या नादात खुलणार प्रेमाची कहाणी; अक्षय वाघमारे-रुचिरा जाधवची नवी जोडी
Painjan Song: डोंगरदऱ्या, हिरवीगार शेतं आणि गावाकडचं सुंदर वातावरण, अशा निसर्गरम्य परिसरात फुलणारी प्रेमकहाणी सांगणारं साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत ...
तर हिमेश रेशमिया देखील आपल्या पत्नीसोबत बसलेले दिसले. हात जोडून ते भक्तीमध्ये मग्न झालेले यावेळी ते किती भावुक होत आहेत हे त्यांच्या चेहऱ्यावरून समजत होते. दरम्यान, आणखी एका व्हिडिओने लोकांची मने हेलावली. त्यामध्ये टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना डोळे मिटून आणि हात जोडून गुरुजींची प्रार्थना करताना दिसत होती. ती इतकी भावुक झाली की तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. तसेच अभिनेता नील नितीन मुकेश देखील सेवा करताना दिसला. तो महासत्संगात उपस्थित असलेल्या भक्तांना स्वतः प्रसाद वाटत होता. त्याची ही कृतीदेखील लक्ष वेधून घेत आहे.View this post on Instagram
गुरुजींच्या दरबारात यांच्याशिवाय मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवरांनीही हजेरी लावली. भूषण कुमार, सेलिना जेटली, गुनीत मोंगा, ललित पंडित, रोहन गंडोत्रा, सोनाली सहगल, साहिल सलाथिया, पूजा चोप्रा, राय लक्ष्मी, गुरप्रीत कौर चड्ढा, सिद्धार्थ सिब्बल, सरगम सिंग, रश्मी आर्य, ऋषभ साहनी आणि मोसेस सिंग या स्टार्सचा यामध्ये समावेश होता. सर्वांनी हात जोडून त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली. या महासत्संगात केवळ कलाकारांच्या उपस्थितीमुळेच नव्हे, तर श्रद्धा, सेवा, भक्ती आणि सर्वांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या भावनांनी भरलेल्या त्या विशेष क्षणांमुळेही चर्चेत राहिला.😭😭 https://t.co/wR3TOEb76w
— shivambanga (@shivambanga) November 17, 2026





