Wednesday, November 18, 2026

Indian Railways : पश्चिम रेल्वेचा नवा विक्रम! एकाच दिवसात सर्व गाड्या 100% वेळेत धावल्या

नियमित रेल्वे सेवांसोबत दिवाळी आणि छठपूजेसाठी विशेष गाड्या सुरू असतानाही पश्चिम रेल्वेने वेळापत्रकाचे पालन केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Mumbai News: पश्चिम रेल्वेने 17 नोव्हेंबर 2026 रोजी झोनल स्तरावर 100 टक्के वेळपालनाची नोंद केली आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी असतानाही ही कामगिरी करण्यात आली. नियमित रेल्वे सेवांसोबत दिवाळी आणि छठपूजेसाठी विशेष गाड्या सुरू असतानाही पश्चिम रेल्वेने वेळापत्रकाचे पालन केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

सणासुदीच्या गर्दीतही रेल्वे वेळेत

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार, सणांच्या काळात रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. पश्चिम रेल्वेचे नेटवर्क आधीच व्यस्त असताना नियमित गाड्यांसोबत दिवाळी आणि छठपूजेसाठी विशेष रेल्वेगाड्याही चालवण्यात येत होत्या.

या परिस्थितीतही 17 नोव्हेंबर रोजी झोनल स्तरावर 100 टक्के वेळपालन नोंदवण्यात आले. नियोजनबद्ध कामकाज आणि विविध विभाग तसेच रेल्वे मंडळांमधील समन्वयामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

सुरक्षित आणि वेळेवर सेवा देण्यावर भर

प्रवाशांना सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह रेल्वे सेवा देण्यासाठी पश्चिम रेल्वे कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांची मागणी वाढलेल्या काळातही रेल्वे सेवा सुरळीत आणि वेळेत चालवण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >