
हैदराबाद : पेट्रोल पंपावर इंधन भरताना सिगारेट ओढल्याने मोठी दुर्घटना घडल्याची घटना हैदराबादमधील कुकटपल्ली येथे समोर आली आहे. मंगळवारी दुपारी एका दुचाकीला अचानक आग लागली. या घटनेत 25 वर्षीय दुचाकीस्वार गंभीर भाजला असून, मोठा स्फोट होण्याची शक्यता असताना पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी कुकटपल्ली येथील पेट्रोल पंपावर आला होता. यावेळी त्याने सिगारेट पेटवली आणि अचानक दुचाकीने पेट घेतला. काही क्षणांत आगीच्या ज्वाळा दुचाकीला वेढू लागल्याने पेट्रोल पंप परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने जळती दुचाकी पंप परिसरातून बाहेर हलवली. त्यानंतर अग्निशमन उपकरणांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर भाजल्याने त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उत्तर प्रदेश : रेल्वे प्रवासात नातेवाईकांना निरोप देण्यासाठी ट्रेनमध्ये चढणे 12 जणांना चांगलेच महागात पडले. उत्तर प्रदेशातील कानपूर सेंट्रल रेल्वे ...
View this post on Instagram
पेट्रोल टँकरमध्ये इंधन उतरवण्याचे काम सुरू होते
विशेष म्हणजे, दुर्घटना घडली त्यावेळी पेट्रोल पंपावर तेलाचा टँकर भूमिगत साठवण टाक्यांमध्ये इंधन उतरवत होता. आग टँकरपर्यंत पोहोचली असती, तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने इंधन उतरवण्याची प्रक्रिया थांबवली. त्यामुळे आग टँकरपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पेट्रोल पंपावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पेट्रोल आणि डिझेलसारख्या ज्वलनशील पदार्थांच्या परिसरात सिगारेट किंवा कोणत्याही प्रकारची आग निर्माण करणारी वस्तू वापरणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. घटनेबाबत अधिक तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.





