Wednesday, November 18, 2026

BMC च्या मालमत्ता कर वसुलीसाठी व्हॉट्सअप आणि गुगल मेसेजचा वापर करणार

मालमत्ता कराची वसुली अधिक प्रभावी करण्यासाठी आणि मालमत्ताधारकांना सुविधा देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने व्हॉटस ॲप बिझनेस आणि गुगल मेसेज प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे.

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मालमत्ता कराची वसुली अधिक प्रभावी करण्यासाठी आणि मालमत्ताधारकांना सुविधा देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने व्हॉटस अप बिझनेस आणि गुगल मेसेज प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे. पुढील तीन वर्षांच्या या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी या प्रणालीच्या उभारणीसाठी विदर्भ इन्फोटेक प्रा. लि यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई माहपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराची आकारणीतून यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल 7 हजार कोटींचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या मालमत्ता कराची प्रभावी आकारणी तसेच नागरिकांना आकारण्यात येणाऱ्या बिलाच्या रकमेबाबत कल्पना मिळावी यासाठी आता महापालिका प्रशासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या अंतर्गत आता महापालिकेच्यावतीने व्हॉटस अप बिझनेस आणि गुगल मेसेज प्रणाली सुरु केली जाणार आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये विदर्भ इन्फोटेक प्रा. लि या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी तीन वर्षांकरता सुमारे २ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >