Kandivali Railway Station: कांदिवली रेल्वे स्थानकात पाकिस्तानी दहशतवादी? RPF ची धावपळ; व्हिडीओ व्हायरल
Mumbai Kandivali Railway Station Viral Video: मुंबईतील कांदिवली रेल्वे स्थानकात पाकिस्तानवरून आलेल्या दहशतवाद्याने AK-47 रायफल घेऊन फिरल्याचा दावा करणारा एक अत्यंत खळबळजनक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे मुंबई पोलीस आणि रेल्वे प्रशासन हादरले होते. मात्र, सायबर तपासात हा संपूर्ण व्हिडिओ बनावट (AI Generated) असल्याचे उघड झाले आहे.
November 18, 2026 10:00 AM
कांदिवली रेल्वे स्थानकात पाकिस्तानी दहशतवादी? RPF ची धावपळ; व्हिडीओ व्हायरल
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
मुंबई: अनेकदा AI व्हिडिओमुळे आपण सहज फसतो, या बनावट व्हिडिओमुळे रेल्वे पोलीस आणि RPF पोलिसांची चांगलीच पळापळ झाली आहे. एका व्हिडिओने, रेल्वे पोलीस आणि RPF पोलिसांना चांगलंच कामाला लावलं आहे. सोशल मीडियाच्या जमान्यात 'फेक न्यूज' आणि AI चा गैरवापर किती भयानक रूप धारण करू शकतो, याचे ताजे उदाहरण मुंबईतील कांदिवलीतून समोर आले आहे. नुकताच कांदिवली रेल्वे स्थानकावरील एक 5 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात AK-47 सारखे अत्यंत घातक शस्त्र घेऊन रेल्वे स्थानकाच्या आवारात बिनधास्त फिरत असल्याचे दिसत आहे. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून थेट पाकिस्तानमधून आलेला दहशतवादी असल्याचा दावा या व्हायरल क्लिपमध्ये करण्यात आला होता.
मुंबई (विशेष प्रतिनिधी): खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेबाबत पारदर्शकता निर्माण व्हावी आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे यासाठी मुंबईतील सर्व ...
पोलीस यंत्रणेत उडाली तारांबळ
कांदिवली रेल्वे स्थानकावरील हा 5 सेकंदाचा व्हिडिओ 16 नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल होत होता. हा व्हायरल होणारा व्हिडिओ रेल्वे पोलिसांपर्यंत Whats App च्या माध्यमातून पोहोचला आहे. व्हिडिओमधील संवेदनशीलता आणि सुरक्षेचा प्रश्न पाहता रेल्वे पोलीस आणि आरपीएफ (RPF) यंत्रणा ताबडतोब हाय अलर्टवर आली. पोलिसांनी कोणतीही रिस्क न घेता तातडीने तपास सुरू केला. कांदिवली रेल्वे स्थानकावरील त्या संपूर्ण दिवसाचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज कसून तपासण्यात आले. एवढेच नव्हे तर श्वान पथकाच्या मदतीने संपूर्ण स्थानक परिसराची आणि फलाटांची कसून झाडाझडती घेण्यात आली.
तांत्रिक तपासणीत सत्य आले समोर
कलेक्टर आणि पोलीस प्रशासनाची तासनतास धावपळ उडाल्यानंतर जेव्हा या व्हिडिओची तांत्रिक तपासणी करण्यात आली, तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. हा व्हिडिओ खरा नसून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्सच्या मदतीने अत्यंत चलाखीने तयार केलेला एक बनावट (Deepfake) व्हिडिओ असल्याचे स्पष्ट झाले. स्थानकात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा घटना घडली नसल्याची खात्री पटल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला.
समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांचे विचार आणि मते जाणून घेण्यासाठी कोकण विभागात विभागीय स्तरावर जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोच्च ...
अज्ञातांवविरोधात FIR दाखल
या प्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी तत्परता दाखवत संबंधित अज्ञात व्यक्तीविरोधात गंभीर गुन्ह्यांतर्गत एफआयआर (FIR) दाखल केला आहे. सध्या सायबर पोलिसांची विशेष टीम या बनावट व्हिडिओमागचे मूळ अकाउंट आणि तो तयार करणाऱ्या भामट्यांचा शोध घेण्यासाठी कसून तपास करत आहे.
मुंबईत AI बनावट व्हिडिओची वाढती समस्या
मुंबईत अलिकडच्या काळात फेक आणि AI बनावट व्हिडिओंचे प्रमाण वेगाने वाढले आहे. याआधीही गेटवे ऑफ इंडिया येथे महाभयंकर त्सुनामी आल्याचा, फिल्म सिटीला भीषण आग लागल्याचा, कुर्ला मॉलमध्ये बिबट्या फिरत असल्याचा, मुंबई हार्बरमध्ये महाकाय मगर आढळल्याचा आणि शहरात उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्याचा अशा अनेक अफवा पसरवणारे बनावट व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सायबर तज्ज्ञांच्या मते, आजकाल काही मिनिटांतच कोणत्याही अत्याधुनिक AI ॲपद्वारे अगदी हुबेहूब आणि वास्तवदर्शी भासणारे व्हिडिओ तयार करणे शक्य झाले आहे, ज्याचा गैरवापर करून समाजात भीती पसरवली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा कोणत्याही पडताळणीशिवाय आलेल्या व्हिडिओवर विश्वास न ठेवण्याचे आणि ते पुढे शेअर न करण्याचे आवाहन केले आहे.