
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत अनेक एसआरए तसेच इतर गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये बालवाडीच्या जागा बाधित होत असल्याने अनेक ठिकाणी बालवाडीचे वर्ग चालवण्यास अडवणी येतात. त्यामुळे महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये, मैदानांमध्ये किंवा उपलब्ध मोकळ्या जागांवर तात्पुरत्या स्वरुपात अंगणवाडी भरवण्यासाठी 'कंटेनर' उपलब्ध करुन देण्यात देण्याची मागणी होत आहे.
उबाठाचे शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली असून यामध्ये त्यांनी याबाबतचे धोरण बनवण्याची मागणी केली आहे. मुंबईतील विविध पुनर्विकास प्रकल्पांमुळे जसे की, एस. आर. ए.. म्हाडा किंवा खाजगी पुनर्विकास प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर जुन्या वस्त्या आणि झोपडपट्टया तोडण्यात येतात. याअंतर्गत महिला व बाल विकास प्रकल्प, महाराष्ट्र शासनाच्यावतीने चालवल्या जाणाऱ्या अनेक अंगणवाड्यांच्या इमारती किंवा जागाही तोडल्या गेल्या आहेत. शासनाच्या नियमानुसार अंगणवाड्या चालवण्यासाठी मिळणारे मासिक भाडे अत्यंत मर्यादित अंदाजे 2000 रुपये असल्याने, वाढत्या महागाईच्या काळात मुंबईसारख्या शहरात इतक्या कमी भाडयात खाजगी जागा मिळणे अशक्य झाले आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी): खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेबाबत पारदर्शकता निर्माण व्हावी आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे यासाठी मुंबईतील सर्व ...
त्यामुळे शेकडो अंगणवाड्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे, 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांचे पोषण, पूर्व प्राथमिक शिक्षण आणि गर्भवती मातांच्या आरोग्याशी संबंधित शासकीय सुविधा त्यांच्यामार्फत पोहचण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. संपूर्ण मुंबईकरांच्या हितासाठी आणि बालकांच्या भविष्याचा विचार करता महानगरपालिकेने यावर एक कायमस्वरुपी आणि सर्वसमावेशक धोरण तयार करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सचिन पडवळ यांनी सांगितले. त्यामुळे ज्या ज्या भागात पुनर्विकास प्रकल्पांमुळे अंगणवाड्यांच्या जागा तोडण्यात आल्या आहेत आणि पर्यायी जागा उपलब्ध होत नाही, अशा सर्व ठिकाणी संबंधित विभागातील महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये, मैदानांमध्ये किंवा उपलब्ध मोकळ्या जागांवर तात्पुरत्या स्वरुपात अंगणवाडी भरवण्यासाठी 'कंटेनर' उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी त्यांनी सांगितले.





