Wednesday, November 18, 2026

Akvan Cyclone: अकवान चक्रीवादळाचा वेग वाढला; 20 नोव्हेंबरला किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले अकवान चक्रीवादळ तीव्र होत असून २० नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आंध्र प्रदेशातील सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर ओडिशातील काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, अकवान चक्रीवादळ बुधवारी तीव्र वादळात रूपांतरित झाले असून २० नोव्हेंबर रोजी दुपारी नेल्लोर आणि विशाखापट्टणम दरम्यानच्या आंध्र प्रदेश यानम किनारपट्टीवर धडकण्यापूर्वी ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यापूर्वी चक्रीवादळ शुक्रवारी सकाळी किनारपट्टीवर धडकणार होते. वादळ किनारपट्टीवर धडकण्यापूर्वी हवामान विभागाने आंध्र परदेशातील एलुरू, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, काकीनाडा, कृष्णा आणि बापटला या सहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी ते तीव्र अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर ओडिशाच्या पुरी, गंजाम, गजपती आणि केंद्रापारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टखाली ठेवले आहे.

बुधवारी हवामान विभागाने सांगितले की, अकवान चक्रीवादळ उत्तर वायव्य दिशेने पुढे सरकत राहील आणि १९नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत त्याची तीव्रता वाढून ते अति तीव्र चक्रीवादळ बनेल. ते उत्तर वायव्य दिशेने आंध्र प्रदेश यानमच्या किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकार राहील. इराणने सुचवलेले अकवान हे चक्रीवादळ ऑक्टोबरपासून बंगालच्या उपसागरात तयार झालेले तिसरे चक्रीवादळ असून ते मंगळवारी तयार झाले आणि तुलनेने हळू पुढे सरकत आहे. नवीनतम उपग्रह प्रतिमेनुसार, ताशी ८९-११७ किमी वाऱ्याच्या वेगासह अकवान हे चेन्नईच्या पूर्वेला सुमारे ५८० किमी, मछलीपट्टणमच्या आग्नेयेला ६१० किमी, विशाखापट्टणमच्या दक्षिण आग्नेयेला ६१० किमी, गोपालपूरच्या दक्षिणेला ७३० किमी आणि श्रीलंकेतील त्रिंकोमालीच्या ईशान्येला ६५० किमी अंतरावर होते.

ओडिशाच्या मयूरभंज, केंदुझार, बालेश्वर, जाजपूर, केंद्रपारा, कटक, जगतसिंगपूर, खोरडा, ढेंकनाल, नयागढ, पुरी, गांजा, गजपथी, रायगरा आणि कोयरा जिल्ह्यासाठी वादळ आणि मध्यम पावसापूर्वी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. आंध्रप्रदेशातील उत्तर किनारी जिल्हे, अल्लुरी सीताराम राजू, पार्वतीपुरम, अम्मायापुरम आणि विजयनगरम जिल्ह्यांसह गुरुवारी ऑरेंज अलर्टवर आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >