
ब्रिटनचे प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट बुधवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. राजकुमार विल्यम आणि राजकुमारी केट त्यांच्या तीन दिवसीय भारत दौऱ्याचा भाग म्हणून २०२६ च्या अर्थशॉट पुरस्कार सोहळ्यासाठी सोमवारी मुंबईत दाखल झाले. राजेशाही जोडप्याने मंगळवारी अर्थशॉट पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली आणि त्यानंतर ते नवी दिल्लीला रवाना झाले, जिथे ते बुधवारी पंतप्रधान मोदी यांना भेटणार आहेत. एप्रिल २०१६ मध्ये केलेल्या पहिल्या भारत दौऱ्यानंतर प्रिन्स विल्यम्स आणि प्रिन्सेस केट यांचा हा दुसरा अधिकृत भारत दौरा आह.
मंगळवारी (१७ नोव्हेंबर) प्रिन्स विल्यम म्हणाले की, अर्थशॉट पुरस्कारासाठी भारतात आल्याने त्यांना आणि प्रिन्सेस केट यांना अत्यंत आनंद झाला आहे. प्रिन्स विल्यम यांनी सांगितले की, भारताने गेल्या सहा वर्षांत अर्थशॉटसाठी असाधारण योगदान दिले आहे. ते म्हणाले की,'अर्थशॉटचा उद्देश नेहमी सर्वोत्तम उपाय शोधणे आणि त्यांना अधिक दूरवर व वेगाने पोहोचण्यास मदत करणे हा आहे आणि हे अभियान प्रदर्शित करण्यासाठी भारतापेक्षा अधिक योग्य ठिकाण असू शकत नाही. या वर्षीच्या अर्थशॉट पुरस्कारासाठी भारतात आल्याचा मला आणि कॅथरीनला खूप आनंद होत आहे. गेल्या सहा वर्षांत भारताने अर्थशॉटसाठी असाधारण योगदान दिले आहे आणि इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक अर्थशॉट अंतिम स्पर्धक आणि विजेते भारतात आहेत.' असे प्रिन्स विल्यम यांनी X वरील एका निवेदनात म्हटले.
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मालमत्ता कराची वसुली अधिक प्रभावी करण्यासाठी आणि मालमत्ताधारकांना सुविधा देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने व्हॉटस ...
प्रिन्स ऑफ वेल्स यांनी स्थापित केलेल्या अर्थशॉट पारितोषिकाचा उद्देश, जगासमोरील काही अत्यंत गंभीर पर्यावरणीय आव्हानांवरील नाविन्यपूर्ण उपायांना ओळखणे, त्यांना मान्यता देणे आणि त्यांचे समर्थन करणे हा आहे. यामध्ये हवामान बदल, कचरा व्यवस्थापन, वायू प्रदूषण, सागरी संवर्धन आणि जैवविविधतेचा ऱ्हास यांचा समावेश आहे. या पुरस्कारांतर्गत दरवर्षी पाच विजेत्यांची घोषणा केली जाते आणि प्रत्येक विजेत्याला त्यांच्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी व त्यांचा विस्तार करण्यासाठी १ दशलक्ष पाउंड दिले जातात.






