अन्न व औषध प्रशासनाची मोठी धडक कारवाई; 1.27 कोटींचा अन्नसाठा जप्त, 12 परवाने निलंबित व 6 व्यवसाय बंद

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महाराष्ट्रात अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर बडगा उगारला है. प्रशासनाने राज्यभरात मोठी धडक कारवाई करत तब्बल १.२७ कोटी रुपयांचा अयोग्य व असुरक्षित अन्नसाठा जप्त केला आहे. या मोहिमेत एकूण १२ नामांकित आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून ६ विक्रेत्यांचे व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. याशिवाय, राज्यात १.६८ लाखांचा प्रतिबंधित तंबाखू व गुटखा साठा जप्त करून ५ जणांना अटक करण्यात आली आहे.


दक्षिण मुंबई व ठाण्यातील ९ नामांकित उपाहारगृहांचे परवाने निलंबित
अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी बृहन्मुंबई आणि कोकण विभागातील प्रमुख आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील ९ नामांकित उपाहारगृहांमध्ये अन्न तयार करण्याचे अस्वच्छ काउंटर, वैद्यकीय तंदुरुस्ती व FoSTaC प्रशिक्षण प्रमाणपत्राचा अभाव, वापरलेल्या तेलाच्या (TPC) नोंदी नसणे आणि FSMS आराखड्याचे पालन न केल्याचे आढळून आले. यामध्ये खालील प्रमुख आस्थापनांचा समावेश आहे:




  • आयडियल रेस्टॉरंट (कॅफे आयडियल), कुलाबा

  • चेतना प्रायव्हेट लि. (आयकॉनिक चेतना रेस्टॉरंट), फोर्ट

  • अल अरेबियन एक्सप्रेस (मियां कबाब्स), फोर्ट

  • चुल्हा रेस्टॉरंट (बायरूट), कफ परेड

  • नॅचरल आइस्क्रीम, चर्चगेट

  • श्रीयोग रेस्टॉरंट, फोर्ट

  • गुप्ता फ्रूट ज्यूस सेंटर, नरीमन पॉईंट

  • प्रकाश डोसा, फोर्ट

  • सौरभ हॉटेल्स, कुलाबा






तसेच ठाणे विभागातील मे. ब्लिंक कॉमर्स प्रा. लि., मे. ब्रोड्यामा फूड्स एलएलपी आणि मे. सागर स्वीट अँड बेकरी या ३ आस्थापनांचे परवाने देखील अन्न सुरक्षेचे नियम मोडल्यामुळे निलंबित करण्यात आले आहेत. निलंबन काळात या आस्थापनांना अन्नपदार्थांची खरेदी-विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.


खाद्यतेल, सुपारी आणि केटरर्सवर मोठी कारवाई




  • पुणे (मावळ): मे. अव्हेन्यू सुपरमार्ट्स लि. (डी-मार्ट) येथे केलेल्या तपासणीत कमी दर्जाचे आणि चुकीचे लेबलिंग (Misbranded) असलेले २०,०८५ लिटर खाद्यतेल (किंमत ₹५०,२७,८९३) जप्त करण्यात आले.

  • नागपूर: वैशाली नगरमधील मे. चापरे रोस्टिंग वर्क आणि मे. न्यू माधव रोस्टिंग या दोन सुपारी युनिट्सवर छापा टाकून, कमी दर्जाची व भेसळयुक्त २५,३५७ किलो सुपारी (किंमत ₹७५,१९,६५४) जप्त करण्यात आली.

  • पुणे (माणिकबाग खाऊ गल्ली): 'ईट राईट स्ट्रीट' मोहिमेतविनापरवाना आणि अस्वच्छतेत व्यवसाय करणाऱ्या ६ खाद्यविक्रेत्यांना 'व्यवसाय बंद' (Stop Business) नोटीस बजावण्यात आली.

  • अकलूज (सोलापूर): मे. मातेश्वरी केटरर्स येथे मुदतबाह्य आणि अनारोग्यकारक मुदतीचा १४४ किलो अन्नसाठा (तूप, पीठ, बेसन, शेव) जप्त करण्यात आला.






प्रतिबंधित अन्नपदार्थांवर कायदेशीर बडगा


बृहन्मुंबई, पुणे, कोकण, नाशिक आणि नागपूर विभागात गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू यांसारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विरोधात व्यापक मोहीम राबविण्यात आली. बोरिवली येथील एका दुकानावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले असून, राज्यभरात एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत शासन अत्यंत कठोर असून, जनतेच्या आरोग्याशी खेळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा प्रशासनाच्या आयुक्तांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : ओबीसी कल्याणासाठी 6,840 कोटींच्या निधीची शिफारस; जानेवारीत राज्यभर 500 विशेष शिबिरे

मुंबई : राज्यातील ओबीसी आणि 18 पगड जातींच्या कल्याणासाठी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांच्या

कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांचा विकास होणार; 18 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन महत्त्वाची जैन तीर्थक्षेत्रं असलेल्या बाहुबली आणि कुंथुगिरी यांच्या सर्वांगीण

Eknath Shinde : दुर्धर आजारांवरील उपचारांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेत निदान आणि उपचार मिळावेत, तसेच महागड्या उपचारांचा

Nitesh Rane : बंदर प्रकल्पांसोबत स्थानिक युवकांना कौशल्य प्रशिक्षण द्या- मंत्री नितेश राणे

मुंबई : वाढवण, दिघी आणि कोकणातील प्रमुख बंदर प्रकल्पांच्या परिसरातील स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध

Maharashtra Pay Rules 2026 : राज्यात यापुढे आठ तासांचा कामाचा दिवस, आठवड्याला 48 तासांची मर्यादा

मुंबई : कामगारांच्या वेतनाचे संरक्षण, कामाचे तास आणि वेतन कपातीसंदर्भात एकसमान कार्यपद्धती निश्चित करणारे

Gondia Railway Station Rescue : गोंदिया रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशाचा थरारक बचाव; आरपीएफ महिला कॉन्स्टेबल ठरल्या देवदुत

गोंदिया : महाराष्ट्रातील गोंदिया रेल्वे स्थानकावर एक अत्यंत हृदयद्रावक आणि थरारक घटना घडली आहे, जिथे एका सतर्क