Nashik Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कसबे वणी–नाशिक रस्त्यावर ओझरखेड धरणाच्या सांडव्याच्या पुढे हॉटेल श्रीहरीजवळ मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भीषण अपघाताची घडली. थार आणि इर्टिगा गाडीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत इर्टिगा गाडीतील चालक सुनिल अरुण शिंदे यांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार थार (क्र. एमएच १५ जेएच ८८८२) नाशिकच्या दिशेने, तर इर्टिगा (क्र. एमएच १५ केयू १२०५) वणीच्या दिशेने जात असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांच्या पुढील भागांचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत कार्य करत जखमींना उपचारासाठी पाठवले. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे (Vani Police Station) सहायक पोलीस निरीक्षक हेमंत फड व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्यात सहभाग घेतला. या अपघातात (Accident) अजय पाटील, दिनेश पाटील, काजल पाटील, भावेश पाटील, शिवसागर शिंदे आणि यश पाटील हे सहा जण जखमी झाले आहेत.
नाशिकमध्ये भीषण अपघात ! सातपूरमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू
नाशिक : शहरातील सातपूर औद्योगिक वसाहतीत मंगळवारी (दि. 17) सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. महिंद्रा सोना कंपनीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. ...
कोणार्कच्या कचरा डंपरखाली चिरडून अकरा वर्षीय मुलगा ठार
दरम्यान, दुसरीकडे मालेगाव शहरातील द्याने-रमजानपूरा कुसुंबा रस्ता परिसरातील खानका सईदीया मशिद रस्त्यावर कोणार्कच्या कचरा डंपरखाली चिरडून अकरा वर्षीय मुलगा जागीच ठार झाला. आज सकाळी हा प्रकार घडला.या दुर्घटनेचा बळी ठरलेल्या दुर्दैवी मुलाचे नाव दस्तगीर मोहंमद सईद (११, रमजानपुरा टाॅवर गल्ली) असे आहे. घटनास्थळी मुलाच्या आईसह कुटुंबातील सदस्यांच्या भावना व कल्लोळ ऐकून उपस्थितांच्या भावना अनावर झाल्या.रमजानपुरा पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे