
Prahaar Marathi News Live: आयफोनच्या EMI वरून वाद, पनवेलमध्ये मित्रानेच मित्राची केली हत्या; आरोपीला अटक
पनवेलमध्ये आयफोनच्या ईएमआयच्या थकित हप्त्यांवरून झालेल्या वादातून एका तरुणाची त्याच्याच मित्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रतीक अंबवले असे मृत तरुणाचे नाव असून, प्रतीक जाधव असे आरोपीचे नाव आहे. वादातून आरोपीने तरुणाची हत्या करून मृतदेह झुडपांमध्ये टाकल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तपासाअंती आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.






