SBI UPI Service : SBI ची UPI सेवा 19 नोव्हेंबरला 45 मिनिटे बंद; ग्राहकांना UPI Lite वापरण्याचा सल्ला

या कालावधीत ग्राहकांना UPI द्वारे पेमेंट करता येणार नाही.




SBI UPI Service : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गुरुवारी, 19 नोव्हेंबर 2026 रोजी बँकेची UPI सेवा 45 मिनिटांसाठी तात्पुरती बंद राहणार आहे. नियोजित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत ग्राहकांना UPI द्वारे पेमेंट करता येणार नाही.






नेमकी कोणत्या वेळेत सेवा बंद राहणार?


SBI ने आपल्या अधिकृत 'X' अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, 19 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 1 वाजून 15 मिनिटांपासून ते पहाटे 2 वाजेपर्यंत बँकेच्या UPI सेवा बंद राहतील. ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि चांगला डिजिटल बँकिंग अनुभव देण्यासाठी हे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.


मात्र, हे काम निर्धारित वेळेच्या आधी पूर्ण झाल्यास सेवा लवकर सुरू होऊ शकते, असेही बँकेने स्पष्ट केले आहे. या काळात ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल SBI ने दिलगिरी व्यक्त केली आहे.






UPI सेवा बंद असताना पेमेंट कसे कराल?


या 45 मिनिटांच्या कालावधीत एखादे महत्त्वाचे पेमेंट करायचे असल्यास ग्राहक UPI Lite सुविधेचा वापर करू शकतात. SBI ने ग्राहकांना या पर्यायाचा सल्ला दिला आहे. BHIM SBI Pay ॲपच्या माध्यमातून UPI Lite वॉलेटमध्ये आधीच पैसे जमा करून ठेवता येतात. त्यामुळे UPI सेवा तात्पुरती बंद असतानाही UPI Lite च्या माध्यमातून पात्र व्यवहार करता येऊ शकतात.



UPI Lite म्हणजे काय? व्यवहारांची मर्यादा किती?


UPI Lite ही छोट्या रकमेच्या डिजिटल व्यवहारांसाठी उपलब्ध असलेली वॉलेटसारखी सुविधा आहे. या माध्यमातून पेमेंट करताना प्रत्येक वेळी UPI PIN टाकण्याची गरज नसते.


RBI च्या नियमांनुसार, UPI Lite द्वारे एका व्यवहारात जास्तीत जास्त 1,000 रुपये पाठवता येतात. तसेच या वॉलेटमध्ये एकावेळी कमाल 5,000 रुपयांपर्यंत शिल्लक ठेवता येते.


त्यामुळे SBI ग्राहकांनी नियोजित देखभाल दुरुस्तीच्या वेळेची नोंद ठेवावी आणि आवश्यक असल्यास UPI Lite मध्ये आधीच पैसे जमा करून ठेवावेत.





Comments
Add Comment

अन्न व औषध प्रशासनाची मोठी धडक कारवाई; 1.27 कोटींचा अन्नसाठा जप्त, 12 परवाने निलंबित व 6 व्यवसाय बंद

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महाराष्ट्रात अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर बडगा उगारला

Chandrashekhar Bawankule : ओबीसी कल्याणासाठी 6,840 कोटींच्या निधीची शिफारस; जानेवारीत राज्यभर 500 विशेष शिबिरे

मुंबई : राज्यातील ओबीसी आणि 18 पगड जातींच्या कल्याणासाठी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांच्या

भारतीय नौदलाच्या 'अल्बाट्रॉस' पथकाने पूर्ण केली सुवर्णमहोत्सवी 50 वर्षे; हिंदी महासागरावर अविरत पहारा

भारतीय नौदलाने आपल्या सामर्थ्यशाली इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले आहे. भारतीय नौदलाच्या दीर्घ पल्ल्याच्या

कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांचा विकास होणार; 18 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन महत्त्वाची जैन तीर्थक्षेत्रं असलेल्या बाहुबली आणि कुंथुगिरी यांच्या सर्वांगीण

Eknath Shinde : दुर्धर आजारांवरील उपचारांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेत निदान आणि उपचार मिळावेत, तसेच महागड्या उपचारांचा

IND vs NZ 1st Test Live Streaming: भारत न्यूझीलंड पहिला कसोटी सामना कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्व डिटेल्स

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची असलेली कसोटी मालिका भारत आणि न्यूझीलंड