Thursday, November 19, 2026

'सत्तेसाठी बाळासाहेबांचा वापर'; उद्धव ठाकरेंवर आनंद परांजपे यांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री होण्यासाठी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेससोबत युती केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनीच बाळासाहेब ठाकरे आणि तमाम शिवसैनिकांची माफी मागायला हवी, असी घणाघाती टीका शिवसेनेचे प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी केली. आज ठाणे येथे माजी खासदार आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

ठाणे:  मुख्यमंत्री होण्यासाठी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेससोबत युती केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनीच बाळासाहेब ठाकरे आणि तमाम शिवसैनिकांची माफी मागायला हवी, असी घणाघाती टीका शिवसेनेचे प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी केली. आज ठाणे येथे माजी खासदार आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमानजनक उल्लेख करणारे पुस्तक बाळासाहेब ठाकरे हयात असते तर महाराष्ट्रात येऊच दिले नसते. मात्र अशी भूमिका उद्धव ठाकरे घेतील का, असा सवाल परांजपे यांनी यावेळी केला.

आनंद परांजपे काय म्हणाले?

सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी शिवसेनेकडून बुधवारी मुंबईत सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची पाने फाडून निषेध करण्यात आला. सावरकरांचा महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात कुठेही अपमान केला तर शिवसेना खपवून घेणार नाही. तसेच सावरकरांविषयी प्रेम असले तर उबाठा गट दिल्लीत सोनिया गांधी यांच्या घरासमोर निषेध आंदोलन करतील का, त्यांना पान क्रमांक 201 आणि 443 मधील सावरकरांचा केलेला अवमान मान्य आहे का, राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान उबाठाला मान्य आहे का, असे खरमरीत सवाल परांजपे यांनी यावेळी उपस्थित केले. तर बाळासाहेबांचे संस्कार आणि हिंदुत्व विसरलो म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांची उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली पाहिजे, असेही आनंद परांजपे म्हणाले.

पुढे बोलताना, उद्धव ठाकरे यांनी केवळ सत्तेसाठी आणि राजकारणासाठी बाळासाहेबांचा वापर केला तर एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाला पुढे घेऊन जात आहेत. ते पुढे म्हणाले की बाळासाहेबांच्या शेवटच्या काळात मातोश्रीच्या पहिल्या माळ्यावर त्यांना काय जेवण दिलं जात होतं हे राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितलं होतं, हे उद्धव ठाकरे विसरले असे परांजपे म्हणाले. आज बाळासाहेबांबद्दल शिवसेनेने काय करावे, याचे उपदेश देणाऱ्यांनी त्यांचा पूर्वइतिहास तपासून बघावा, असा टोला परांजपे यांनी केला. बाळासाहेब हे प्रत्येक शिवसैनिकांसाठी दैवत आहेत, त्यांचा अपमान स्वप्नात देखील कोणी करणार नाही, असे परांजपे म्हणाले.

तसेच, 27 ऑगस्ट 2004 रोजी शिवाजी पार्क येथे झालेल्या आंदोलनात बाळासाहेबांनी मणिशंकरला जोडे मारले होते. बाळासाहेब मातोश्रीत वापरत असलेली स्वत:ची चप्पल घेऊन आले होते, त्याच पांढऱ्या चप्पलने बाळासाहेबांनी मणिशंकर अय्यरच्या पुतळ्याला पहिला जोडा मारला होता, त्याचप्रमाणे सोनिया आणि राहुल गांधींच्या पुतळ्याला चप्पल मारण्याचे धारिष्ट्य उद्धव ठाकरे दाखवणार का, असा सवाल परांजपे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला. सावरकरांचा अवमान करणाऱ्या सोनिया गांधींवर आणि राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय राऊत करतील का, असेही आनंद परांजपे म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >