
झेल पकडताना काय झालं?
प्रसिद्ध कृष्णाने निकोल्सला आखुड टप्प्याचा चेंडू टाकला. यावर पुल शॉट मारताना निकोल्स चुकला आणि चेंडू बॅटच्या कडेला लागून बॅकवर्ड स्क्वेअरला गेला. त्यामुळे तिथे उभ्या असलेल्या देवदत्त पडिक्कलच्या हाती सोपा झेल होता. पण विकेटकीपर ऋषभ पंत त्या झेलसाठी धावत गेला आणि देवदत्त पडिक्कल कन्फ्यूज झाला. त्यात त्याने झेल पकडण्याचा कॉल दिल्याने पडिक्कल निश्चिंत राहिला. पण त्याला शेवटच्या क्षणी कळलं की हा झेल त्याचा आहे आणि त्याने हात टाकला. पण तिथपर्यंत उशीर झाला आणि सोपा झेल सुटला. सोपा झेल सुटल्याने प्रसिद्ध कृष्णाने आश्चर्य व्यक्त करत हाताने तोंड झाकले. तर देवदत्त पडिक्कल पंतकडे पाहत राहिला. झेल सुटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.🔴DEVDUTT PADIKKAL DROPS AN EASY CATCH, GILL ANGRY WITH HIM 🤦
- Prasidh Krishna bowled a bouncer to Henry Nicholls, which resulted in a catching opportunity for India. - Padikkal & Pant both ran towards the ball. Padikkal called for the catch, saying it was his, but ended up dropping it. - Gill was furious and shouted at him, while Pant also had something to say. 😒 — Sam (@cricsam02) November 19, 2026
IND vs NZ 1st Test: टीम इंडियाची चांगली सुरूवात, पण सहाव्या विकेटने केली गडबड; पहिल्या दिवशी असं घडलं
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह येथे सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि ...





