मुंबई: महाराष्ट्राच्या भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अद्वितीय सोहळा असलेल्या कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूर नगरी सज्ज झाली आहे. येत्या 21 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या पवित्र यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) मोठी तयारी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने सुमारे 1000 जादा बसेस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी मोठी तयारी ! गर्दी नियंत्रणासाठी डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाचा वापर
नाशिक : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गर्दी व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी आतापासूनच ...
कार्तिक शुद्ध एकादशी अर्थात प्रबोधिनी एकादशीचे वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात, अशी दृढ श्रद्धा असल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून तसेच परराज्यांतूनही भाविक चंद्रभागेच्या तीरावर दाखल होतात. पंढरपूरच्या या भक्तिमय वातावरणात होणारी संभाव्य मोठी गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने काटेकोर नियोजन केले आहे.
चंद्रभागा बसस्थानकासह विविध महत्त्वाच्या ठिकाणांहून राज्याच्या वेगवेगळ्या भागांसाठी जादा बसफेऱ्या चालवण्यात येणार आहेत. केवळ जाण्यापुरतेच मर्यादित न राहता, विठुरायाचे दर्शन झाल्यानंतर भाविकांना आपल्या मूळ गावी सुरक्षित आणि वेळेत परतता यावे, यासाठी परतीच्या प्रवासासाठीही पुरेशा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गर्दीचे सुयोग्य व्यवस्थापन, बसफेऱ्यांचे वेळापत्रक आणि प्रवाशांची सुरक्षा या बाबींना महामंडळाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 12 डिसेंबरचा बारामती दौरा रद्द
मुंबई : बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याने ...
या यात्रेच्या निमित्ताने भाविकांसाठी एसटीच्या विविध सवलतींची योजना अत्यंत फायदेशीर ठरत आहे. अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तर 65 ते 75 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना तिकिट दरात 50 टक्के सवलत दिली जाते. या सवलतींचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा आणि खासगी वाहनांचा पर्याय न निवडता एसटीच्या सुरक्षित, विश्वासार्ह आणि आरामदायी सेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
प्रवासादरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी महामंडळाचा संपूर्ण कर्मचारी वर्ग सज्ज आहे. भक्तीचा हा प्रवास असो वा दर्शनानंतरची परतीची वाट, प्रत्येक टप्प्यावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी कटिबद्ध असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाची कार्तिकी एकादशी यात्रा अधिक सुखकर आणि सुरक्षित ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.