पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 12 डिसेंबरचा बारामती दौरा रद्द

बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या 'प्रेरणास्थळा'च्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित असलेला बारामती दौरा तूर्तास रद्द करण्यात आला आहे.

मुंबई : बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याने त्यांच्या दौऱ्याच्या नव्या तारखेकडे लक्ष लागले होते. मात्र, पंतप्रधानांचा बारामती दौरा तूर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी दिली. येत्या 12 डिसेंबरला स्वतः शरद पवार या प्रेरणास्थळाचे उद्घाटन करणार आहेत.


पंतप्रधान मोदी यांचा बारामती दौरा यापूर्वी 16 नोव्हेंबर रोजी नियोजित होता. मात्र, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर दौऱ्याची नवी तारीख शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. यासंदर्भात शरद पवार यांनी बैठकही बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी पंतप्रधानांचा दौरा तूर्तास रद्द झाल्याचे स्पष्ट केले.


शरद पवार हे येत्या १२ डिसेंबरला आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. त्याच दिवशी त्यांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन होणार आहे. शुक्रवारी शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार आणि जय पवार हे विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात उपस्थित होते. पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्याची माहिती दिल्यानंतर शरद पवार गोविंदबाग या निवासस्थानी रवाना झाले. दरम्यान, विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार आणि जय पवार यांची बैठक सुरू होती.






दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या बारामती दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. मोदी बारामतीत येणार असल्याने या दौऱ्याच्या राजकीय अर्थाबाबतही चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता दौरा रद्द झाल्याचे शरद पवार यांनीच स्पष्ट केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Comments
Add Comment

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारकडून नियोजन, ऑगस्ट 2027 पर्यंत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मास्टरप्लॅन; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले निर्देश

मुंबई: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे. यामुळे राज्य सरकारकडून राज्यामध्ये

Gondia Murder Conspiracy: सिनेमालाही लाजवेल असं कथानक; कारच्या GPS लोकेशनने पतीचं उलगडलं गुपित, जंगलात घडली धक्कादायक घटना

महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. पतीच्या दुसऱ्या महिलेसोबत असलेल्या

Baramati Airport : बारामती विमानतळाच्या विकासासाठी १३२ कोटींचा निधी मंजूर

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर चर्चेत आलेल्या बारामती विमानतळाच्या

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, अर्थशास्त्राच्या परीक्षेच्या वेळेत अंशत: बदल; वाचा सविस्तर वेळापत्रक

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या वेळापत्रकामध्ये बदल

Dhule News: मणिपूरमध्ये कर्तव्य बजावताना धुळ्याचे सुपुत्र जयेश माळी यांना वीरमरण, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

महाराष्ट्र: मणिपूर राज्यातील इम्फाळ पूर्व परिसरामध्ये देशसेवेचे कार्य करत असताना धुळे तालुक्यातील एका

Prahaar Marathi News Live, 20 November 2026 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मातृशोक, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Prahaar Marathi News Live दिनांक 20 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,