Friday, November 20, 2026

अभिनेत्री प्रीतिका रावने केलं लग्न! श्री श्री रविशंकर यांच्या आशीर्वादात पार पडला विवाहसोहळा

'बेइंतहा' आणि 'लव्ह का है इंतजार' यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या तसेच बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव हिची बहीण प्रीतिका राव सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. प्रीतिकाने नुकतंच लग्न केलं आहे. विशेष म्हणजे, कोणताही तामझाम न करता तिने अत्यंत साध्या आणि पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे.

Preetika Rao Weeding : 'बेइंतहा' आणि 'लव्ह का है इंतजार' यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या तसेच बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव हिची बहीण प्रीतिका राव सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. प्रीतिकाने नुकतंच लग्न केलं आहे. विशेष म्हणजे, कोणताही तामझाम न करता तिने अत्यंत साध्या आणि पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे. तिच्या आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. त्यामुळे तिचे चाहते खुश झाले आहेत.

बंगळुरूमधील आश्रमात पार पडलं लग्न

बंगळुरूमधील आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये प्रीतिका विवाह केला आहे. दक्षिण भारतीय तमिळ अय्यर या परंपरेनुसार तिचा विवाहसोहळा पार पडला. या खास प्रसंगी कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या शुभाशीर्वादात प्रीतिकाचा विवाहसोहळा पार पडला. त्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावत नवदाम्पत्याला शुभ आशीर्वाद दिले. प्रीतिकाने लग्नाचे फोटो शेअर केले असले तरी तिच्या पतीची ओळख मात्र दाखवली नाही. तिने फोटोंमध्ये पतीचा चेहराही ब्लर केला आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by PREETIKA RAO (@preetika_pree)

प्रीतिकाच्या इंस्टाग्राम पोस्टवरील कॅप्शन मध्ये तिने सांगितले आहे की, माझे गुरुदेव श्री श्री रविशंकर जी, माझे प्रिय आई-वडील, बहीण अमृता, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी यांच्या आशीर्वादाने, बंगळुरू येथील 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या अतिशय सुंदर आणि शांत परिसरात माझा विवाह संपन्न झाला. गुरुदेवांनी स्वतः माझ्या लग्नाला उपस्थित राहून मला आशीर्वाद दिले, जे माझ्यासाठी या सोहळ्यातील सर्वात खास क्षण ठरले!

आता मी एका पारंपरिक 'तमिळ-ब्राह्मण' (Tam-Brahm) कुटुंबाचा भाग झाले आहे. येथील संस्कृती माझ्या कर्नाटकस्थित 'मंगलोरियन' मुळांशी खूप मिळतीजुळती आहे - अत्यंत प्राचीन आणि मौल्यवान! मी काही निवडक छायाचित्रेच शेअर करत आहे, कारण मला वाटते की हा एक अत्यंत खाजगी आणि पवित्र अनुभव आहे, जो पूर्णपणे सर्वांसमोर उघड करणे योग्य ठरणार नाही! , असे प्रतिकाने म्हंटले आहे.

तसेच मी माझ्या आध्यात्मिक पॉडकास्टची सुरुवात 3 वर्षांपूर्वी गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या मुलाखतीतून केली होती. आणि नुकतेच, 'युट्यूब इंडिया'वर जागतिक प्रेक्षकांसाठी 'वैदिक ज्योतिष' (Vedic Astrology) विषयावरील माझे पॉडकास्ट लोकप्रिय ठरल्याबद्दल, सांस्कृतिक मंत्रालयाने (Ministry Of Culture) मला 'प्रशंसापत्र' (Letter Of Appreciation) देऊन सन्मानित केले आहे. हे दोन महत्त्वाचे टप्पे! आणि दोन्ही 2026 मध्ये आम्ही दोघेही विवाहबंधनात अडकलो.

माझे सर्व समर्थक, हितचिंतक आणि ज्यांना माझ्या आनंदात खऱ्या अर्थाने सहभागी व्हायला आवडते, त्या सर्वांचे मनापासून आभार! तुमचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव असेच असू द्या! खूप खूप प्रेम!

अभिनयाला रामराम करत आध्यात्मिकतेकडे कल

प्रीतिकाने 2018 नंतर अभिनय क्षेत्रापासून थोडे अंतर घेतले. 'बेइंतहा' या मालिकेतील आलिया या भूमिकेमुळे प्रितिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. मात्र, अभिनय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव चांगला असतानाही तिने करिअरची दिशा बदलण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तिने पॉडकास्ट आणि मुलाखती सादर करण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत तिचा कल आध्यात्मिकता, ज्योतिषशास्त्र आणि भारतीय संस्कृतीशी संबंधित विषयांकडे असल्याचे पाहायला मिळाले. श्री श्री रविशंकर यांच्या मुलाखतीपासून तिने आध्यात्मिक पॉडकास्टचा प्रवास सुरू केला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >