Nashik : दिवाळीत नाशिक एसटी विभागाची बंपर कमाई, 25.67 कोटींचा महसूल, उत्पन्नात 1.35 कोटींची वाढ

दिवाळीच्या काळात ८०१ बसगाड्यांच्या माध्यमातून ४३.१५ लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून नाशिक विभागाने २५.६७ कोटी रुपयांचा महसूल मिळवला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात १ कोटी ३५ लाख रुपयांची वाढ झाली आहे.

नाशिक : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणारे प्रवासी आणि पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्याने एसटी महामंडळाच्या नाशिक विभागाला मोठा आर्थिक फायदा झाला आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांनी एसटी प्रवासाला दिलेल्या पसंतीमुळे विभागाने तब्बल २५ कोटी ६७ लाख रुपयांचा महसूल मिळवला आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात १ कोटी ३५ लाख रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.



८०१ बस, २०० जादा फेऱ्या


दिवाळीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन नाशिक विभागाने जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवरून जादा बसगाड्यांचे नियोजन केले होते. विभागातील ८०१ बसगाड्यांच्या माध्यमातून २०० जादा फेऱ्या चालवण्यात आल्या. या कालावधीत एसटीने एकूण ४३.१५ लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रवासी वाहतुकीतही १.०२ लाख किलोमीटरची वाढ झाली आहे.



नाशिक-पुणे मार्गावरील एसी बसला मोठी पसंती


दिवाळीच्या काळात नाशिक-पुणे मार्गावरील सर्व वातानुकूलित बसगाड्यांचे आरक्षण १०० टक्के झाले होते. याशिवाय धुळे, नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख मार्गांवरही प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सप्तशृंग गड आणि त्र्यंबकेश्वर या धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या भाविकांसाठीही जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते.






महिलांसाठीही विशेष सुविधा


भाऊबीजेच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेऊन महामंडळाने एनएमसीएस कार्डची अट शिथिल केली होती. त्यामुळे अनेक महिला प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता आला. दरम्यान, दिवाळी पाडव्यानंतर मुंबई नाका, मध्यवर्ती बसस्थानक आणि निमाणी बसस्थानक येथे प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. सुट्ट्या संपल्यानंतर नोकरी आणि शिक्षणासाठी मुंबई-पुण्यासह अन्य शहरांकडे परतणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली होती.



गतवर्षीपेक्षा १.३५ कोटींचे अधिक उत्पन्न


दिवाळीच्या काळात ८०१ बसगाड्यांच्या माध्यमातून ४३.१५ लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून नाशिक विभागाने २५.६७ कोटी रुपयांचा महसूल मिळवला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात १ कोटी ३५ लाख रुपयांची वाढ झाली आहे. विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी ही माहिती दिली. आगार व्यवस्थापक, चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध कामामुळे हा विक्रमी महसूल मिळवणे शक्य झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Baramati Airport : बारामती विमानतळाच्या विकासासाठी १३२ कोटींचा निधी मंजूर

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर चर्चेत आलेल्या बारामती विमानतळाच्या

Nashik Crime : चारित्र्यावर संशय, सततचा छळ अन् अखेर भयानक शेवट, नाशिकमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या

नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात सलग आठव्या दिवशी घसरण, आठ दिवसांत सोनं 12,400 रुपयांनी स्वस्त, पाहा आजचे दर

Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या बाजारात घसरणीचे सत्र सुरूच आहे. एकीकडे सोन्याने काही

Public Private Partnership: महापालिकेच्या नवीन रुग्णालयांमध्ये पीपीपी अंतर्गत् चांगल्याप्रकारे मिळणार सुविधा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात चांगली सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रशासनाचे प्रयत्न

Nashik : नाशिकमध्ये निवृत्त RTO अधिकाऱ्याची आत्महत्या, राहत्या घरात स्वतःवर झाडली गोळी

नाशिक : नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत गोविंद

Firecracker Ban: मुंबईत रॉकेट आणि आकाशात उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांवर बंदी; महापालिका प्रशासनाने दिले आदेश

मुंबई (विशेष् प्रतिनिधी): मुंबई महापालिका सभागृहात पुन्हा एकदा दिया मिर्झा यांच्या नावाचे फटाके फोडण्याच्या