स्मार्टफोन खरेदी महागणार ? वर्षअखेरीस फोनच्या किमती 30 टक्क्यांहून अधिक वाढण्याची शक्यता, जाणून घ्या कारण

स्मार्टफोनच्या वाढत्या किमती पाहता ग्राहकांना आता फोन खरेदी करताना अधिक विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. केवळ ब्रँड किंवा आकर्षक फीचर्स पाहून फोन खरेदी करण्याऐवजी त्याची बॅटरी, प्रोसेसर, कॅमेरा, सॉफ्टवेअर अपडेट्स आणि दीर्घकालीन कार्यक्षमता तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्या स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे अनेकजण नवीन फीचर्स आणि आधुनिक तंत्रज्ञान असलेले फोन खरेदी करण्याला प्राधान्य देतात. मात्र, येत्या काळात नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. कारण जागतिक बाजारपेठेत स्मार्टफोनच्या किमती वाढण्याचे संकेत मिळत आहेत. रिसर्च फर्म काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार, २०२६ च्या अखेरपर्यंत प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किमती ३० टक्क्यांहून अधिक वाढू शकतात. त्यामुळे नवीन फोन खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना बजेटचा नव्याने विचार करावा लागू शकतो.



५० ते ७० हजारांचे फोन लाखाच्या घरात जाणार ?


काही वर्षांपूर्वी १ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा स्मार्टफोन खरेदी करणे ही मोठी गोष्ट मानली जात होती. मात्र, आता प्रीमियम स्मार्टफोनच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. पूर्वी ५० ते ७० हजार रुपयांच्या दरम्यान मिळणारे अनेक प्रीमियम फोन आता लाख रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. तर अ‍ॅपल आणि सॅमसंगसारख्या मोठ्या कंपन्यांचे टॉप मॉडेल्स दोन लाख रुपयांच्या आसपास पोहोचत आहेत. त्यामुळे ब्रँडेड आणि प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर अधिक ताण येऊ शकतो.



स्मार्टफोन महागण्यामागे AI तंत्रज्ञानाचा हात ?


स्मार्टफोनच्या किमती वाढण्यामागे मेमरी चिप्सच्या वाढत्या किमती हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः DRAM आणि NAND या मेमरी चिप्स महाग झाल्याचा परिणाम मोबाइल उत्पादनाच्या खर्चावर होत आहे. जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. AI डेटा सेंटर्सची संख्या आणि त्यांची क्षमता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेमरी चिप्सची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे या चिप्सची मागणी वाढली असून, त्यांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे.


काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार, २०२५ च्या सुरुवातीला स्मार्टफोन तयार करण्याच्या एकूण खर्चात मेमरी चिप्सचा वाटा सुमारे १३ टक्के होता. मात्र, २०२६ च्या अखेरपर्यंत हा वाटा ४३ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढत असून, त्याचा थेट परिणाम स्मार्टफोनच्या विक्री किमतीवर होण्याची शक्यता आहे.






अ‍ॅपल, सॅमसंगसह या कंपन्यांचे फोन महागले


मेमरी चिप्सच्या वाढत्या किमतींचा परिणाम अनेक मोठ्या स्मार्टफोन ब्रँड्सवर दिसू लागला आहे. अहवालानुसार, ओप्पोच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किमतीत गेल्या वर्षभरात ८२ ते ८७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तर अ‍ॅपलच्या आयफोनच्या किमतीत २० ते २२ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.


दुसरीकडे, सॅमसंगने दिवाळीपूर्वी Galaxy S26 या फ्लॅगशिप सीरिजच्या किमतीत १७ टक्क्यांनी वाढ केली होती. दिवाळीनंतरही काही मॉडेल्सच्या किमतीत दोन हजार ते चार हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शाओमीनेही सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर आपल्या काही स्मार्टफोनच्या किमती वाढवल्या आहेत.



नवीन फोन खरेदी करताना ग्राहकांनी काय लक्षात ठेवावे ?


स्मार्टफोनच्या वाढत्या किमती पाहता ग्राहकांना आता फोन खरेदी करताना अधिक विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. केवळ ब्रँड किंवा आकर्षक फीचर्स पाहून फोन खरेदी करण्याऐवजी त्याची बॅटरी, प्रोसेसर, कॅमेरा, सॉफ्टवेअर अपडेट्स आणि दीर्घकालीन कार्यक्षमता तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकंदरीत, AI तंत्रज्ञानाची वाढती मागणी आता स्मार्टफोनच्या बाजारपेठेवरही परिणाम करताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात नवीन स्मार्टफोन खरेदी करणे ग्राहकांसाठी अधिक खर्चिक ठरण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Prachi Desai: दीड वर्षांनंतर प्राची देसाई सोशल मीडियावर परतली! ‘Proof of existence’ म्हणत शेअर केले फोटो

[caption id="attachment_1077497" align="alignnone" width="800"] अभिनेत्री प्राची देसाई एका वर्षापेक्षा जास्त काळानंतर सोशल मीडियावर परत आली आहे, तिने

Nashik Crime : इन्स्टाग्रामवर ड्रेसची रील पाहून ड्रेस ऑर्डर केला अन् तरुणीला 99 हजारांचा ऑनलाइन गंडा बसला , नेमकं काय घडलं ?

नाशिक : सोशल मीडियावर आकर्षक ड्रेसची रील पाहून ऑनलाइन खरेदी करणे सिडको परिसरातील एका तरुणीला चांगलेच महागात

Anti-Narcotics Van: अमली पदार्थांविरोधी मोहिमांसाठी मुंबई पोलिसांना ‘अँटी-नार्कोटिक्स व्हॅन’

मुंबई : अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासह गुन्ह्यांच्या तपासातील त्रुटी दूर करण्यासाठी मुंबई

DPIFF Awards 2026: पुरस्कार सोहळ्यात ‘धुरंधर’ची हवा! रणवीर-अक्षयने मारली बाजी

बॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट 'धुरंधर'ने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म

Kurla Crime: कुर्ल्यात तरुण जोडप्याला हॉकी स्टिक, बेल्टने मारहाण; 8 अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल

कुर्ला येथील एका बागेत किशोरवयीन जोडप्याला मारहाण केल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आठ मुलांना ताब्यात घेतले

Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर चार दिवस वाहतुकीत बदल

नाशिक : नाशिकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. त्र्यंबकेश्वर रोडवरील पिंपळगाव बहुला येथील नंदिनी नदीवरील पुलावर