IND vs NZ: भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात रचला इतिहास, 27 वर्षे जुना विक्रम मोडला
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना वेलिंग्टन येथे सुरू आहे. या सामन्यात चार दिवसांचा खेळ संपला असून पाचवा दिवस निर्णायक आहे. भारताकडे हा सामना जिंकण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडला हा सामना वाचवावा लागणार आहे. या सामन्यातील पहिल्या भारताने ऐतिहासिक कामगिरी केली.
November 22, 2026 02:54 PM
IND vs NZ: भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात रचला इतिहास, 27 वर्षे जुना विक्रम मोडला (Photo: BCCI Twitter)
भारत न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू असून निर्णायक स्थितीत आला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 119 धावांवर 2 विकेट गमावल्या आहे. भारताने पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीपासून न्यूझीलंडचा संघ अजूनही 233 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी भारतीय संघ विजयापासून 8 विकेट दूर आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. हा निर्णय चार दिवसांचा खेळ पाहता योग्यच होता असं म्हणावं लागेल. न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 368 धावा केल्या होत्या. या प्रत्युत्तरात भारताने 720 धावांचा डोंगर रचला आणि 9 विकेट गमावून डाव घोषित केला. त्यामुळे भारताकडे पहिल्या डावात 352 धावांची मजबूत आघाडी आहे. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या 119 धावांवर दोन विकेट पडल्या आहे. त्यामुळे हा सामना पूर्णपणे भारताच्या पारड्यात झुकला आहे. आता न्यूझीलंडला सामना राखण्यासाठी पूर्ण दिवस खेळून काढावा लागणार आहे. असं असताना पहिल्या डावात भारताने 720 धावा करत ऐतिहासिक नोंद केली आहे.
27 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?
भारताने यापूर्वी 1999 मध्ये म्हणजेच आजपासून 27 वर्षांपूर्वी अहमदाबादमध्ये मोठी धावसंख्या उभारली होती. तेव्हा भारताने 7 विकेट गमवून 583 धावा केल्या होत्या आणि डाव घोषित केला होता. तेव्हा हा सामना ड्रॉ झाला होता. भारताने न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्याच देशात दुसऱ्यांदा 500हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी 2009 मध्ये हॅमिल्टनमध्ये खेळलेल्या कसोटी सामन्यातील एका डावात भारताने 520 धावा केल्या होत्या. आता भारातने 720 धावा केल्या आहेत. आघाडीच्या फलंदाजांनी या धावसंख्येत मोलाचं योगदान दिलं आहे. तसेच मधल्या फळीची उत्तम साथ लाभली. भारताकडून टॉप पाच फलंदाजांनी 80हून अधिक धावा केल्या. यात 2 शतकं आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा भारत दुसरा संघ आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या टॉप 5 फलंदाजांनी 2014 मध्ये अबूधआबीत न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
मुंबई: वेलिंग्टनमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यामध्ये चौथ्या दिवशी भारताच्या यष्टीरक्षक (विकेटकिपर) फलंदाज ऋषभ पंतने दमदार कामगिरी ...
पाचव्या दिवसातील तीन सत्र ठरणार निर्णायक!
कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी तीन सत्र निर्णायक ठरू शकतात. कारण न्यूझीलंडला दुसऱ्या डावात भारतासमोर विजयी लक्ष ठेवण्यासाठी 233 धावांचा पल्ला ओलांडावा लागणार आहे. या दरम्यान धडाधड विकेट पडल्या तर भारताचा विजय पक्का होईल. दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या उर्वरित आठ विकेट्स झटपट बाद करून 233 धावांच्या आत गुंडाळून एका डावाने विजय मिळवण्याचे ध्येय असेल. न्यूझीलंड अजूनही 233 धावांनी मागे आहे, त्यामुळे हा सामना त्यांच्या हातातून निसटला आहे. भारत गोलंदाजीत एक जबरदस्त कामगिरी करून येथे विजय खेचून आणू शकेल का? की सामना कंटाळवाणा अनिर्णित राहील? भारताकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत काही महत्त्वाचे गुण मिळवण्याची संधी आहे.